असं झालं तर… एफडीमधून जास्त रिटर्न मिळवायचे आहे?

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

पैसे गुंतवायचे म्हटले की, भारतीयांच्या मनात पहिला पर्याय हा एफडीचा येतो; कारण हा एक सुरक्षित पर्याय आहे. यामध्ये निश्चित परतावा (Fixed Return) मिळतो, तसेच यात कोणताही धोका नसतो.

एकाच दीर्घकालीन एफडीमध्ये सर्व पैसे गुंतवण्याऐवजी, ती रक्कम १, ३ आणि ५ वर्षे अशा वेगवेगळ्या कालावधीच्या एफडीमध्ये विभागून ठेवा. याला ‘एफडी लॅडरिंग’ (FD Laddering) म्हणतात.

अल्पकालीन एफडी मॅच्युअर झाल्यावर, तुम्ही ती नवीन आणि जास्त व्याजदराने पुन्हा गुंतवू शकता. गरज पडल्यास काही रक्कम सहज उपलब्ध होते आणि संपूर्ण एफडी मोडावी लागत नाही.

एफडीमध्ये व्याज मासिक, त्रैमासिक किंवा मॅच्युरिटीवर एकाच वेळी घेण्याचा पर्याय मिळतो. तुम्ही एका एफडीमधून मासिक किंवा तिमाही व्याज घेऊन रोजचा खर्च भागवू शकता.

दुसरी एफडी ‘क्युम्युलेटिव्ह’ (Cumulative) पर्यायामध्ये ठेवा, जेणेकरून मॅच्युरिटीवर जास्त रक्कम मिळेल. सर्व एफडी एकाच बँकेत न ठेवता सरकारी, खाजगी आणि स्मॉल फायनान्स बँकांमध्ये विभागा.