व्हॉट्सअॅपचे डिलीट केलेले मेसेज वाचायचे आहेत…वापरा ‘ही’ ट्रिक…

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

अनेकदा चुकून एखाद्याला मेसेज पाठवला जातो आणि लक्षात आल्यावर तो लगेच डिलीटही केला जातो. मात्र, मेसेजमध्ये नेमके काय होते, त्यामुळे तो पाठवणाऱ्याकडून डिलीट करण्यात आला, असा प्रश्न काहीजणांना पडतो. काहीजण नेमके काय डिलीट केले, याचा विचार करत बसतात. डिलीट करण्यात आलेला मेसेजही आता वाचता येणार आहे. त्यामुळे नेमके काय डिलीट केले, या प्रश्नाचे उत्तर आता सापडणार आहे.

व्हॉट्सअॅपने युजर्ससाठी डिलीट केलेले मेसेज वाचण्यासाठी एक पर्याय दिला आहे. त्यामुळे डिलीट झालेले मेसेज पाहणे शक्य झाले आहे.

  • डिलीटेड मेसेज वाचण्यासाठी सर्वात आधी अँड्रॉयड फोनवर WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल करा.
  • WhatsRemoved+ अ‍ॅप इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला तिथे दिलेल्या नियम आणि अटी मान्य कराव्या लागतील.
  • अ‍ॅप वापरण्यासाठी तुम्हाला फोन नोटिफिकेशनचा अॅक्सेस द्यावा लागेल.
  • त्यानंतर तुम्ही असे अ‍ॅप्स निवडा ज्यांचे नोटिफिकेशन तुम्हाला पाहायचे आहेत.
  • यामध्ये तुम्हाला WhatsApp मेसेज इनेबल करावं लागेल. त्यानंतर continue बटणावर क्लिक करा.
  • तसेच फेसबुक, इन्स्टाग्रामचाही यामध्ये पर्याय दिसेल. फेसबुक, इन्स्टाग्रामचेही नोटिफिकेशन्स हवे असल्यास तुम्ही त्यांचे पर्याय इनेबल करु शकता.
  • आता तुम्ही थेट अशा पेजवर जाल जिथे तुम्हाला डिलीट केलेले सर्व मेसेज दिसतील.
  • अॅप्स केवळ अँड्रॉयड युजर्ससाठी आहेत, आयओएस युजर्ससाठी कोणतंही पर्याय नाही.