
आपल्याजवळ असलेला महत्त्वाचा डेटा कुणी ऐऱ्यागैऱ्याच्या हाती लागू नये असे वाटत असेल तर पेनड्राइव्हसाठी देखील पासवर्ड सेट करता येतो. पेनड्राइव्हला कोणत्याही बाहेरच्या सॉफ्टवेअर शिवाय पासवर्डने कसे प्रोटेक्ट करू शकतो हे इथे देत आहोत. काही लहानसहान स्टेप्समधून पासवर्ड कसा सेट करतात ते इथे सांगत आहोत.
स्टेप – 1
सर्वात अगोदर आपल्या कंप्युटरमध्ये यूएसबी पेनड्राइव्ह लावा. त्यानंतर पेनड्राइव्ह जोडला गेल्याचा संदेश दिसेल आणि आयकॉनही स्क्रीनवर झळकेल. त्या आयकॉनवर राइट क्लिक करा. आता ‘Turn on BitLocker’ या पर्यायावर क्लिक करा.
स्टेप – 2
आता ‘यूज पासवर्ड टू प्रोटेक्ट द ड्राइव’ वर क्लिक करा. यानंतर एक पासवर्ड टाका. दुसऱ्यांदा त्याची पुष्टी करावी लागेल. आपण टाकलेला पासवर्ड विसरू नये म्हणून त्याची अन्य ठिकाणी नोंदणी करा.
स्टेप – 3
जोपर्यंत ‘सेव द की फॉर फ्यूचर रेफरेंस’ असा संदेश येत नाही तोपर्यंत नेक्स्ट बटनावर क्लिक करणे सुरू ठेवा.
स्टेप – 4
आता एन्क्रिप्शन प्रोसेस ऑटोमॅटीक सुरू होईल. यानंतर आपला पेनड्राइव्ह पासवर्डने सुरक्षित होईल.
स्टेप – 5
आता आपला पेनड्राइव्ह कुणालाही वापरता येणार नाही. योग्य पासवर्ड टाकल्यानंतरच पेनड्राइव्ह ओपन करता येईल. तसेच रिमूव्ह पासवर्डसाठी देखील अशाप्रकारे स्टेप्सचा आधार घेता येईल.




























































