
सोशल मेसेजिंग अॅप्लिकेशन व्हॉट्सअॅप हे सगळ्यांच्याच आयुष्यातला एक महत्त्वाचा भाग झालं आहे. खासगी चॅटिंगपासून ते व्यावसायिक पातळीपर्यंत व्हॉट्सअॅपचा वापर सर्रास केला जातो. त्यामुळे त्याच्या वापराचे जितके फायदे आहेत, तितके धोकेही आहेत.
त्यातला एक मुख्य धोका म्हणजे मेसेज दुसऱ्या कुणीतरी वाचणं. आपण केलेलं चॅटिंग किंवा पाठवलेले मेसेज जर कोणी बघितले, वाचले तर ते आपल्या खासगीपणाच्या अधिकारांवर अतिक्रमण होतं. बऱ्याचदा ही व्यक्ती आपल्या ओळखीची असते, त्यामुळे आपण त्यांना थेट सांगू शकत नाही. अशा वेळी व्हॉटसअॅपमधील एक पर्याय तुमच्यासाठी उपयुक्त ठरू शकतो.
या फीचरचं नाव टू फॅक्टर ऑथेंटिकेशन असं आहे. त्यामुळे तुमचे मेसेज इतर कुणीही वाचू नये यासाठी एका पिनने ते लॉक करता येतात. चॅटिंग वाचण्यासाठी तुम्हाला पिन नंबर टाकावा लागतो, मगच तुम्ही चॅट वाचू शकता
टू-फॅक्टर ऑथेंटिकेशन कसे अॅक्टिव्ह कराल ?
व्हॉटस्अॅपवरील मेसेज सुरक्षित ठेवण्यासाठी टू फॅक्टर ऑथेंटिकेशन अॅक्टिव्ह करू शकता. यासाठी व्हॉट्सअॅप उघडून डाव्या बाजूला असलेल्या तीन डॉटवर क्लिक करा. आता सेटिंगमध्ये जा. तेथे अकाउंट या पर्यायावर क्लिक करा. त्यात तिसरा पर्याय टू स्टेप व्हेरिफिकेशन हा दिसेल. आता हे सिलेक्ट करून इनेबल करा.
सिलेक्ट करताच मोबाईलवर 6 अंकाचा पिन दिसेल. पिन नंबर टाकताच फिचर अॅक्टिव्ह होईल. तसेच यावर आपला ईमेल आयडीही तुम्ही टाकू शकता. कारण जर तुम्ही पिन नंबर विसरलात तर तो पुन्हा रिसेट करण्यासाठी इमेल गरजेचा आहे आणि डेटा डिलिट होण्याची शक्यता टाळता येते.
याआधी व्हॉटसअॅप चॅटिंगवर फिंगर प्रिंट हा सिक्युरिटी ऑप्शन होता. पण, ज्यांना फिंगरप्रिंटचा पर्याय जमत नाही त्यांना आता मेसेजला लॉक करण्याचे ऑप्शनही व्हॉट्सवर उपलब्ध आहे. यासाठी सेटिंगमध्ये जाऊन प्रायव्हसीमध्ये तुम्हाला हव्या असलेल्या ऑप्शनची निवड करू शकता.
फिंगर प्रिंट लॉक कसे लावाल ?
व्हॉटसअॅपच्या सेटिंगमध्ये फिंगरप्रिंटचा ऑप्शन असेल. तो इनेबल करून या लॉकचा फायदा घेऊ शकता. अशा प्रकारे इतरांपासून तुम्ही तुमचे मेसेज सुरक्षित ठेवू शकता.


























































