Pickle- पावसाळ्यात घरच्या लोणच्याला बुरशी येते का? जाणून घ्या या महत्वाच्या टिप्स

हिंदुस्थानी घरांमध्ये लोणच्याशिवाय जेवण अपूर्ण वाटते. अनेकदा असे घडते की पावसाळ्यात लोणचे खराब होते, म्हणजेच लोणच्याला बुरशी येते. घरी जेवण कितीही साधे बनवले तरी, जर त्यासोबत आंबट आणि मसालेदार लोणचे वाढले तर जेवणाची चव वाढते. बऱ्याचदा असे घडते की, भाज्यांशिवाय लोणच्यासोबत रोटी-पराठा खायला आवडतो. आंबा असो, मिरची असो किंवा फणस असो, कोणत्याही गोष्टीचे लोणचे आवडीचे असते. हा हिंदुस्थानी पदार्थाचा एक महत्त्वाचा भाग आहे पण पावसाळ्यात घर ओलसर होते ज्यामुळे लोणच्यावर बुरशी वाढण्याची शक्यता वाढते. तर आता ही समस्या कमी करण्यासाठी तुम्ही काय करू शकता.

लोणचे एकदा बनवले तर ते वर्षभरही खराब होत नाही, परंतु ते योग्य पद्धतीने साठवणे खूप महत्वाचे आहे. विशेषतः पावसाळ्याच्या दिवसात जास्त काळजी घेणे आवश्यक आहे. पावसाळ्यात अनेकदा लोणचे बुरशीसारखे बनते. याची अनेक कारणे असू शकतात. म्हणून, लोणचे साठवताना काही खबरदारी घ्यावी लागते.

पावसाळ्याच्या दिवसातही लोणचे खराब होण्यापासून वाचवण्यासाठी तुम्ही कोणत्या गोष्टी लक्षात ठेवल्या पाहिजेत.

 

 

 

लोणच्याचे साहित्य कोरडे असावे

घरी लोणचे बनवत असाल तेव्हा लक्षात ठेवा की, तुम्ही आंबा, फणस, कांदा यांसारखे जे काही लोणचे बनवत आहात ते पूर्णपणे वाळवून घ्यावे. तसेच लोणच्यामध्ये तुम्ही कोणतेही मसाले घाला, ते ओले नसावेत. जर असे झाले तर पावसात ओलावा असल्याने लोणचे खराब होण्याची शक्यता वाढते.

 

 

 

जास्त तेल आणि मीठ घाला

घरगुती लोणचं बनवत असताना त्यामध्ये भरपूर तेल आणि मीठ घाला, कारण बऱ्याचदा असे होते की, मीठ आणि तेलाच्या कमतरतेमुळे लोणच्याला बुरशी लागते आणि खराब होते.

 

 

 

लोणचे या पद्धतीने साठवा

सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे तुम्ही लोणचे बनवल्यानंतर ते कसे साठवता. लोणचे कधीही ओल्या डब्यात ठेवू नका. याशिवाय, लोणचे प्लास्टिकच्या डब्याऐवजी ते सिरेमिक जार किंवा काचेच्या डब्यात ठेवण्याचा प्रयत्न करा जेणेकरून पावसाळ्यातही लोणचे खराब होणार नाही.

 

 

 

लोणचे काढण्यासाठी कोरडा चमचा वापरा

केव्हाही जेवणासोबत लोणचे वाढता तेव्हा लक्षात ठेवा की, ज्या चमच्याने तुम्ही लोणचे काढता तो कोरडा असावार.  ओल्या चमच्याने लोणच्यामध्ये ओलावा येतो त्यामुळे लोणचे खराब होऊ शकते.

 

 

 

या गोष्टी टाकल्याने लोणच्याला बुरशी येत नाही.

लोणच्याला बुरशीपासून वाचवण्यासाठी, तुम्ही लोणच्यात एक चमचा सायट्रिक आम्ल घालू शकता किंवा एक चमचा व्हिनेगर वापरू शकता. यामुळे लोणच्यामध्ये बुरशी वाढण्यापासून रोखले जाते. सुरुवातीला लोणचे बनवताना, डब्यावर झाकण ठेवू नका, त्याऐवजी ते सुती कापडाने झाकून ठेवा आणि काही दिवस सूर्यप्रकाशात ठेवल्यानंतर त्यावर झाकण ठेवा.