
सध्याच्या घडीला दातांशी संबंधित समस्या या खूप वाढू लागल्या आहेत. मग ती दातांमधील पोकळी असो किंवा दातांवरील पिवळेपण असतो. तुम्हाला तुमचे दात मोत्यासारखे चमकदार दिसावे असे वाटत असल्यास, आपल्याला काही साधे सोपे उपाय करणे हे खूप गरजेचे आहे. दातांच्या पिवळेपणासाठी चहा, कॉफी, कोल्ड्रिंक्स, एनर्जी ड्रिंक्स, रेड वाईन, डार्क सोडा जबाबदार असतात. परंतु काही महत्त्वाची काळजी घेतल्यास, दातांवरील पिवळेपण सहज दूर करता येईल.
दात मोत्यासारखे चमकवण्यासाठी या गोष्टीचा वापर करुन बघा.
दात पांढरे दिसण्यासाठी आपल्याला केळीचा वापर करता येऊ शकतो. केळीला हे एक फळ आहे ज्याला गुणांचे भांडार म्हटले जाते. केळीमध्ये कॅल्शियम आणि फॉस्फरस सारखे पोषक घटक आढळतात.
दातांसाठी केळीचा वापर कसा करावा?
पिवळे दात पांढरे करण्यासाठी, प्रथम एका भांड्यात केळीचा गर काढा. नंतर थोडे मीठ आणि थोडा लिंबाचा रस घाला आणि मिसळा. आता ही पेस्ट तुमच्या दातांवर लावा आणि काही वेळ घासून घ्या. नंतर स्वच्छ पाण्याने धुवा. काही दिवस असे सतत केल्याने तुम्हाला स्वतःला फरक दिसून येईल.
हा उपाय करायचा नसेल, तर केळी धुवा आणि त्याची साल काढून दातांवर घासून घ्या, असे केल्याने पिवळे दात पांढरे होण्यासही मदत होऊ शकते. कारण केळीच्या सालीमध्ये ब्लीचिंग गुणधर्म असतात, जे तुमचे दात स्वच्छ ठेवण्यास उपयुक्त ठरू शकतात. केळीच्या सालीचा वापर दात पांढरे करण्यासाठी देखील करता येतो.