
हिंदुस्थानात रेल्वेतून दररोज लाखो लोक प्रवास करतात. रेल्वेच्या अनेक सेवा आता ऑनलाइन उपलब्ध आहेत. रेल्वेतील बहुतांश सुविधा ऑनलाइन असल्याने प्रवाशांना फायदा झाला आहे, तर रेल्वे कर्मचाऱ्यांवरील कामाचा ताणही कमी झाला आहे. इंडियन रेल्वे कॅटरिंग अँड टुरिझम कॉर्पोरेशन (IRCTC) वेबसाइट आणि अॅपच्या मदतीने प्रवासी तिकीट बुकिंगपासून ते जेवण बुक करण्यापर्यंत अनेक सुविधांचा लाभ घेऊ शकतात.
तुम्ही जेव्हा रेल्वेचे तिकीट बुक करता तेव्हा ते तिकीट कन्फर्म असेलच असे नाही. अनेकदा रेल्वेचे तिकिट वेटिंगमध्ये असतात. अलीकडेच IRCTC ने आपल्या प्रवाशांसाठी एका महिन्यात ऑनलाइन तिकीट बुक करण्याची मर्यादा दुप्पट केली आहे. आता आयआरसीटीसी आयडी आधारशी लिंक केल्यावर यूजर एका महिन्यात 24 तिकिटे बुक करू शकतो. यापूर्वी तो फक्त 12 तिकिटे बुक करू शकत होता. त्याचप्रमाणे प्रवासी घरी बसून अॅप आणि रेल्वे वेबसाइटच्या मदतीने ट्रेनची स्थिती तपासू शकतात.
अनेकदा आपण बुक केलेली रेल्वेची तिकिटे वेटिंगमध्ये असतात. तिकीट वेटिंगमध्ये असपवार मोठा गोंधळ निर्माण होतो. आता प्रवासी IRCTC अॅप आणि वेबसाइटच्या मदतीने त्यांचा गोंधळ दूर करू शकतात. तुमचे वेटिंग तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता काय आहे हे तुम्ही शोधू शकता. वेटिंग तिकीट शोधण्यासाठी, तुमच्याकडे इंटरनेट कनेक्शनसह मोबाइल, लॅपटॉप किंवा संगणक असणे आवश्यक आहे. तसेच पीएनआर क्रमांक देखील आवश्यक आहे.
सर्व प्रथम तुम्ही IRCTC वेबसाइटवर जा. तुमचा आयडी आणि पासवर्ड वापरून तिथे लॉग इन करा. त्यानंतर जे पेज उघडेल त्यावर PNR नंबर टाका आणि Get Status वर क्लिक करा. त्यानंतर खाली येण्यासाठी खाली स्क्रोल करा व कन्फर्मेशन मिळवा. यावेळी एक नवीन पॉप-अप विंडो उघडेल. यामध्ये तुमचे तिकीट कन्फर्म होण्याची शक्यता सांगितली जाईल.






















































