रेड लाईट भाग खुले केल्यास कोरोना संसर्ग वाढण्याची भीती

रेड लाइट भाग खुले केल्यास आगामी वर्षभरात या भागात राहणाऱ्या 4 लाखांहून अधिक देहविक्रय करणाऱ्या महिला आणि रहिवाशांमध्ये संसर्ग होऊ शकतो तसेच 12 हजारांहून अधिक जणांचे मृत्यू होऊ शकतात असे एका अभ्यासातून पुढे आले आहे.

हावर्ड मेडिकल स्कूल आणि येल स्कूल ऑफ मेडिसिनमधील तज्ज्ञांनी केलेल्या अभ्यासातून ही माहिती पुढे आली आहे. यामधून कोलकाता, पुणे आणि नागपूर यांसारख्या शहरांत 90 टक्के केसेस आणि मृत्यूंची नोंद होऊ शकते असे स्पष्ट संकेत देण्यात आले आहेत. याविषयी येल युनिव्हर्सिटीचे डॉ. अभिषेक पांडेय म्हणाले, ‘लैंगिक व्यवहारादरम्यान सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अशक्यच आहे. या परिसरातील रहिवाशांमध्ये सेक्स वर्कर, दलाल आणि कुंटणखान्याचे मॅनेजर या घटकांना संसर्गाचा धोका सर्वाधिक आहे. प्रतिबंधात्मक उपाययोजना राबवून रेड लाईट परिसरात राहणाऱ्या हजारो नागरिकांचा जीव वाचवता येतील.’

आपली प्रतिक्रिया द्या