
सामना ऑनलाईन । धरमशाला
पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ हिमाचल प्रदेश क्रिकेट असोसिएशनने (एचपीसीए) पाकिस्तानचा पंतप्रधान इम्रान खान, वासीम अक्रम यांच्यासह 13 पाकिस्तानी खेळाडूंचे स्टेडियममध्ये लावलेले फोटो काढून फेकून दिले आहेत.
पुलवामा दहशतवादी हल्ल्यात शहीद झालेल्या जवानांच्या कुटुंबीयांच्या भावनांचा आदर करून आम्ही ते फोटो काढून टाकले आहेत, असे स्पष्ट मत एचपीसीएचे व्यवस्थापक एच. एस. मन्हास यांनी यावेळी व्यक्त केले. 2005 साली हिंदुस्थान बोर्ड अध्यक्षीय इलेव्हन व पाकिस्तान संघ यांच्यामध्ये एचपीसीए येथे सराव सामना खेळवण्यात आला होता. या सराव सामन्याप्रसंगी हे फोटो काढण्यात आले होते.























































