
राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने बारावी परीक्षेचा अर्ज भरण्यास मुदतवाढ दिली आहे. परीक्षेसा बसू इच्छिणारे विद्यार्थी नियमित शुल्कासह 12 डिसेंबरपर्यंत ऑनलाइन अर्ज सादर करू शकतात. मात्र त्यानंतर अर्ज करणाऱया विद्यार्थ्यांकडून विलंब शुल्क आकारण्यात येणार आहे. विलंब शुल्कासह अर्ज करण्याची मुदत 20 डिसेंबर सायंकाळी 5 वाजेपर्यंत आहे, असे राज्य शिक्षण मंडळ सचिव डॉ. अशोक भोसले यांनी सांगितले. www.mahahsscboard या वेबसाईटवर विद्यार्थी ऑनलाइन परीक्षा अर्ज सादर करू शकतात.





























































