HSC Result -कोल्हापूर विभाग 92.42 टक्क्यांसह तिसऱ्या स्थानी

413

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळा कडुन फेब्रुवारी-मार्चमध्ये घेतलेल्या बारावी परीक्षेचा निकाल आज दुपारी ऑनलाईन जाहीर करण्यात आला. राज्यात नऊ विभागांत कोल्हापूर विभाग ९२.४२ टक्के सह तिसऱ्या क्रमांकावर राहिला. तर कोल्हापूर विभागात ९३.११ टक्के सह कोल्हापूर जिल्हा प्रथम,९२.१८ टक्के सह सातारा जिल्हा दुसऱ्या आणि ९१.६३ टक्के सह सांगली जिल्हा तिसऱ्या क्रमांकावर राहिला.

दरम्यान गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा निकालात ५.३३ टक्के इतकी वाढ झाली आहे. शिवाय उत्तीर्णतेत मुलांपेक्षा मुलींनी (७.५६ टक्के) बाजी मारण्याची परंपरा कायम राखली आहे.

कोल्हापुर विभागात तिन्ही जिल्ह्यांत १६२ केंद्रावर ही परीक्षा पार पडली. एकूण ५५ हजार ८१४ पैकी ५३ हजार ९०० मुली उत्तीर्ण झाल्या. मुलींचे उत्तीर्णतेचे हे प्रमाण ९५.५७ टक्के आहे. तर ६८ हजार ४४४ पैकी ६० हजार ५६९ मुले उत्तीर्ण झाले. मुलांच्या उत्तीर्णतेचे हे प्रमाण ८९.०१ टक्के आहे. परीक्षा काळात गैरमार्गाचा अवलंब करणाऱ्या ४० विद्यार्थ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. एका विद्यार्थ्यास पुढे पाच वर्षे परीक्षेसाठी बंदी घातली आहे.

गुणपडताळणीसाठी १७ ते २७ जुलै २०२० पर्यंत व छायाप्रतीसाठी १७ जुलै ते ५ ऑगस्ट पर्यंत ऑनलाईन अर्ज आणि शुल्क भरावे असे आवाहन कोल्हापूर विभागीय मंडळाचे प्रभारी अध्यक्ष सुरेश आवारी यांनी केले आहे.

आपली प्रतिक्रिया द्या