
Huawei ने नुक्तंच Nova 9 आणि Nova 9 Pro हे सोन स्मार्टफोन लॉन्च केले आहेत. या फोनमध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा असून 8 GBचा रॅम देण्यात आला आहे.
Huawei च्या दोन्ही फोनमध्ये क्वाड रियर कॅमेरा देण्यात आला आहे. तसेच ऑक्टा कोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन 778G SoC चाही समावेश अहे. Huawei Nova 9 Pro मध्ये ड्युअल सेल्फी कॅमेरा देण्यात आला असून 100 वॅट फास्ट चार्जिंग देण्यात आला आहे. तर Huawei Nova 9 मध्ये सिंगल सेल्फी कॅमेरा असून 66 वॅटचा चार्जिंग सपोर्ट देण्यात आला आहे.
Huawei Nova 9 मध्ये 50 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. तर 8 मेगापिक्सल्चा अल्ट्रा वाईड शूटरही देण्यात आला आहे. Huawei Nova 9 मध्ये रियर कॅमेरा सेटअप दोन मेगापिक्सलचा डेप्थ सेन्सर आणि मायक्रो शूटरही देन्यात आला आहे. या फोनमध्ये सेल्फी आणि व्हिडीओ कॉलिंगसाठी 32 मेगापिक्सलचा कॅमेरा देण्यात आला आहे. Huawei Nova 9 मध्ये 128 आणि 256 GB इंटर्नल मेमरीचा पर्याय देण्यात आला आहे. Huawei Nova 9 Pro मध्ये स्नॅपड्रॅगन 778G SoC, Adreno 642L GPU आणि 8GB RAM देण्यात आला आहे.
Huawei Nova 9 ची किंमत 30 हजार 800 रुपये इतकी आहे. तर 256 GB असलेल्या फोनची किंमत 34 हजार 200 रुपये इतकी आहे. तर Huawei Nova 9 Pro ची किंमत 40 हजार इतकी असून 256 GB स्टोरेज असलेल्या फोनची किंमत 44 हजार 500 इतकी आहे.





























































