‘हायपरलूप’ची पहिली मानवी चाचणी यशस्वी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

विमानापेक्षा दुप्पट वेगाने धावणाऱया व्हर्जिन हायपरलूप पंपनीच्या हायस्पीड पॉड यंत्रणेची पहिली मानवी चाचणी रविवारी यशस्वीपणे पार पडली. व्हर्जिन हायपरलूप पंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गिगल आणि ‘पॅसेंजर एक्सपिरियन्स’ संचालक सारा लुचियान हे हायपरलूपचे पहिले प्रवासी ठरले.

त्यांच्या पॉडने ताशी 172 कि.मी.पेक्षा अधिक वेगाने प्रवास केला. अशा पद्धतीने हायपरलूप सेवेची मानवी चाचणी करणारी व्हर्जिन हायपरलूप ही पहिली कंपनी ठरली आहे.

अमेरिकेच्या नेवाडा प्रांतातील लॉस वेगास येथील टेस्टिंग ट्रकवर रविवारी हायपरलूपची मानवी चाचणी घेण्यात आली. या चाचणीत जोश गिगल आणि सारा लुचियान यांना पॉडमध्ये बसवण्यात आले. पॉडची ताशी 160 कि.मी. वेगाने चाचणी घेण्यात आली. त्यानंतर हायपरलूपच्या पहिल्या मानवी चाचणीचे व्हिडिओ, फोटो आणि माहिती कंपनीने अधिकृत ट्विटर हॅण्डलवरून पोस्ट केले.

ताशी 966 कि.मी.चा वेग गाठू शकतो

उद्योजक रिचर्ड ब्रॅन्सन यांच्या मालकीच्या व्हर्जिन हायपरलूप पंपनीने पॉड बेस्ड ट्रेन सिस्टीम बनवली आहे. या तंत्रज्ञानात हवेच्या निर्वात पोकळीतून गतिरोधाशिवाय विशिष्ट वाहनातून प्रवाशी किंवा सामानाची ने-आण करणे शक्य होते. त्याचा वेग ताशी 966 कि.मी.पेक्षा अधिक असू शकतो. पहिली प्रवाशी चाचणी यशस्वीपणे पार करून पंपनीने इतिहास रचल्याची भावना व्हर्जिन हायपरलूपचे अध्यक्ष सुलतान अहमद बिन सुलेयम यांनी व्यक्त केली.

अमेरिकेत 2030पर्यंत पहिली हायपरलूप ट्रेन

व्हर्जिन हायपरलूप कंपनीच्या कामाने वेग पकडला आहे. 2025पर्यंत पंपनीला सेफ्टी सर्टिफिकेट मिळू शकते. त्यानंतर 2030पर्यंत अमेरिकेत पहिली हायपरलूप ट्रेन धावू शकते, असा अंदाज आहे.

आतापर्यंत 400 चाचण्या पार

व्हर्जिन हायपरलूपने आतापर्यंत पॉड बेस्ड ट्रेन सिस्टीमच्या अनेक चाचण्या केल्या आहेत. नेवाडा येथील टेस्टिंग ट्रकवर विनाप्रवाशांच्या आतापर्यंत 400 चाचण्या झाल्या आहेत. अमेरिकेत न्यूयॉर्प आणि वॉशिंग्टन या शहरांदरम्यान हायपरलूप ट्रेन चालवली जाणार आहे. त्यामुळे न्यूयॉर्प ते वॉशिंग्टन दरम्यानचा प्रवास 30 मिनिटांत पार पडेल. पॉड सिस्टीम विमानांपेक्षा दुप्पट आणि हायस्पीड ट्रेनपेक्षा चार पट जास्त वेगाने धावेल.

हिंदुस्थानातही अनेक मार्गांवर हायपरलूपची योजना

हिंदुस्थानातही जलद आणि सहज प्रवासासाठी हायपरलूप योजना राबवण्याचा विचार आहे. यात मुंबई- पुणे, बंगळुरू शहर ते बंगळुरू विमानतळ, अमृतसर ते चंदिगड, भोपाळ ते इंदूर- जबलपूर या मार्गांचा समावेश आहे. हायपरलूप ट्रेनमुळे मुंबई ते पुणे प्रवास 23 मिनिटांत करणे शक्य होणार आहे.

ताशी 172 कि.मी. वेगाने दोघांना घेऊन धावला पॉड, हायपरलूपचा पुढचा प्रवासी पुण्याचा तनय मांजरेकर

हायपरलूप प्रकल्पाची पहिली मानवी चाचणी काल यशस्वी झाली. व्हर्जिन हायपरलूप पंपनीचे मुख्य तंत्रज्ञान अधिकारी जोश गिगल आणि पॅसेंजर एक्सपिरियन्स संचालक सारा लुचियान यांना हायपरलूपचे पहिले प्रवासी होण्याचा मान मिळाला. यानंतर पुढच्या फेरीत व्हर्जिन हायपरलूपचे पॉवर इलेक्ट्रॉनिक्स तज्ञ आणि पुण्याचे रहिवासी तनय मांजरेकर प्रवास करणार आहेत.

हायपरलूप प्रवासाच्या सुरक्षिततेसंदर्भात आतापर्यंत अनेक चाचण्या झाल्या आहेत. मानवी चाचणी यशस्वी होण्याची ही ऐतिहासिक कामगिरी असल्याचे कंपनीने सांगितले. हायपरलूप प्रोजेक्ट आणि त्यातील पहिल्या प्रवासाविषयी तनय मांजरेकर म्हणाले, हायपरलूपवर काम करणे आणि त्यातून पहिल्यांदा प्रवास करणाऱयांपैकी एक असणे ही माझ्यासाठी स्वप्नपूर्ती आहे. हिंदुस्थान हे आव्हान स्वीकारून जगाच्या अनेक मैल पुढे जाण्याची संधी ओळखेल. त्यातून मुंबई-पुणे हायपरलूप प्रकल्प वेग घेईल.