
ऑस्ट्रेलियात कोरोनाचे नवे रुग्ण वाढू लागले असून, देशात एका दिवसात आतापर्यंत विक्रमी रुग्ण आढळले आहेत. त्यामुळे सिडनी, व्हिक्टोरिया, मेलबर्नसह अनेक भागांत लॉकडाऊन सप्टेंबरपर्यंत वाढले आहे. मात्र, लॉकडाऊनच्या विरोधात लोक थेट रस्त्यावर उतरले आहेत. मेलबर्नमध्ये नागरिकांनी लॉकडाऊन व सरकारविरोधी निदर्शने सुरू केली आहेत. शनिवारी पोलीस व निदर्शकांदरम्यान हिंसक धुमश्चक्री उडाल्या. त्यात सहा पोलीस गंभीर जखमी झाले असून, त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
मेलबर्न पोलीस म्हणाले, मेलबर्न राज्यामध्ये कोरोनाचे 77 नवे रुग्ण आढळून आल्यानंतर लॉकडाऊन आणखी कडक करण्यात आला आहे. मात्र, लोकांचा लॉकडाऊनला विरोध आहे. पोलिसांनी आतापर्यंत 218 निदर्शकांना अटक करण्यात आली आहे. प्रत्येक निदर्शकाला सुमारे 3 लाख रुपयांचा दंड ठोठावण्यात आला आहे. दरम्यान, ऑस्ट्रेलियात शनिवारी कोरोनाचे 894 नवे रुग्ण आढळून आले. ही संख्या 19 महिन्यांतील सर्वाधिक आहे.




























































