हुंकार सभेचे मंडप पूजन संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते संपन्न

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना प्रतिनिधी । नगर

विश्व् हिंदू परिषद बजरंगदल आयोजित गांधी मैदान येथे गुरुवारी सायंकाळी ६ वाजता श्रीराम मंदिर निर्माणासाठी हुंकारसभेचे आयोजन करण्यात आले आहे. या हुंकार सभेचे मंडप पूजन शहराचे ग्रामदैवत श्री विशाल गणेश देवस्थानचे पुजारी संगमनाथजी महाराज यांच्या हस्ते श्रीफळ वाढवून संपन्न झाले. याप्रसंगी विश्व् हिंदू परिषदेचे जिल्हा मंत्री डॉ. प्रदीप उगले, जिल्हासहमंत्री गजेंद्र सोनवणे, शहरमंत्री अनिल देवराव, बजरंग दल जिल्हा संयोजक गौतम कराळे, संपर्क प्रमुख राजेंद्र चुंबळकर, विशाल रायमोकर, सुरक्षा प्रमुख बाली जोशी आदी उपस्थित होते.

याप्रसंगी जिल्हासहमंत्री गजेंद्र सोनवणे म्हणाले की, श्रीराम मंदिरासाठी सर्वत्र उत्साहाचे वातावरण आहे. अयोध्येत राम मंदिर निर्माण भव्य दिव्य व्हावे ही हिंदू समाजाची भावना आहे. संतांच्या आशीर्वादाने नगर शहरात भव्य हुंकार सभेचे विश्व् हिंदू परिषदेने केले आहे. या सभेला हिंदू समाजाने मोठ्या संख्येनी सहभागी होऊन ईश्वरीय कार्याला हातभार लावावा, असे आवाहन त्यांनी यावेळी केले.