Nagar News – कौटुंबिक वादातून पतीने पत्नीची हत्या केली, मग स्वतः पोलिसांसमोर कबुली

कौटुंबिक वादातून धारदार शस्त्राने गळा चिरून पतीने पत्नीची हत्या केल्याची धक्कादायक घटना नगरमध्ये उघडकीस आली आहे. शुक्रवारी पहाटे तीनच्या सुमारास शेवगाव शहरातील ब्राम्हणगल्ली येथे ही घटना घडली. पत्नीची हत्या केल्यानंतर पतीने स्वतःहून पोलीस ठाण्यात हजर झाला. सचिन दिलीप काथवटे असे आरोपीचे नाव आहे.

शेवगाव शहरातील ब्राम्हणगल्ली येथे आरोपी सचिन दिलीप काथवटे हा पत्नी आणि दोन मुलांसह राहत होता. शुक्रवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमरास पती-पत्नीमध्ये वाद झाला. वाद विकोपाला गेल्याने संतापाच्या भरात पतीने पत्नीची धारदार शस्त्राने गळा चिरुन हत्या केली. पत्नीची हत्या केल्यानंतर आरोपी पती सचिन काथवटे हा स्वतः पोलीस ठाण्यात दाखल झाला.

पतीच्या कबुलीनंतर शेवगाव पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा करत गुन्हा दाखल केला. पती-पत्नीमध्ये नेमका कोणत्या कारणातून वाद झाला हे अद्याप कळू शकले नाही. पोलीस पुढील तपास करत आहेत.