पत्नीच्या आत्महत्येसाठी पतीची प्रेयसी जबाबदार नाही- उच्च न्यायालय

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन । भोपाळ

पत्नीच्या आत्महत्येसाठी पतीच्या प्रेयसीला जबाबदार मानता येणार नाही, असा निर्णय मध्य प्रदेश उच्च न्यायालयाने दिला आहे. एका प्रकरणावर सुनावणी करताना उच्च न्यायालयाने हा निर्णय दिला आहे. तीन वर्षांपूर्वी हे प्रकरण झालं होतं.

डिसेंबर 2015मध्ये अविनाश सिंह यांची पत्नी प्रतिमा सिंह हिने आत्महत्या केली होती. मृत्युपूर्व जबाबामध्ये प्रतिमा हिने अविनाश याचे सतना येथे राहणाऱ्या एका महिलेशी विवाहबाह्य संबंध होते. त्यामुळे अविनाश आपल्याला मारहाण करत असल्याचं प्रतिमाने म्हटलं होतं. पोलिसांनी तपासानंतर अविनाश आणि त्याच्या प्रेयसीवर आत्महत्येसाठी प्रवृत्त करणं आणि सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला होता.

हे प्रकरण सत्र न्यायालयातून उच्च न्यायालयात गेल्यानंतर न्यायमूर्ती अंजुलि पालो यांनी प्रेयसीवरील आरोप हटवण्याचे आदेश दिले. न्यायालयाने दिलेल्या निर्णयानुसार, सदर महिलेचे फिर्यादी महिलेच्या नवऱ्यासोबत संबंध असतील किंवा नाही, हा वेगळा मुद्दा आहे. जर हे संबंध आहेत असं आपण मानून चाललो तरीही ही महिला त्यांच्या घरी राहून तिला हुंड्यासाठी छळ करत असेल, असं गृहित धरता येणार नाही. फक्त तिचे पीडितेच्या नवऱ्याशी विवाहबाह्य संबंध असणं हा आत्महत्येला प्रवृत्त केल्याचा सबळ पुरावा होऊ शकत नाहीत, असा निर्वाळा देत महिलेवरील सर्व आरोप न्यायालयाने फेटाळून लावले.

summary- husbands lover cannot book for provoking suicide