
प्रदूषणमुक्त आणि स्वस्तात मस्त पर्याय म्हणून इलेक्ट्रिक गाडय़ांना नागरिकांची पसंती मिळत आहे. सध्या मार्केटमध्ये इलेक्ट्रिक दुचाकी, चारचाकी आणि बसेस उपलब्ध आहेत. येणाऱया काळात चक्क इलेक्ट्रिक ट्रक देशातील रस्त्यावर धावताना दिसणार आहेत. इलेक्ट्रिक बस मॅन्युफॅक्चरिंगमध्ये नैपुण्य मिळवणाऱया आणि देशात सर्वाधिक इलेक्ट्रिक बस पुरवणाऱया हैद्राबादस्थित ओलेक्ट्रा कंपनीने सध्या इलेक्ट्रिकवर चालणाऱया ट्रकच्या चाचण्या सुरु केल्या आहेत. विशेष म्हणजे, हा ट्रक एका चार्ंजगमध्ये 220 किमी अंतर कापणार आहे. त्यामुळे येत्या काळात ट्रान्सपोर्ट सेक्टरमध्ये मोठे परिवर्तन बघायला मिळेल, यात शंका नाही.

























































