
सामना ऑनलाईन । नवी दिल्ली
काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांनी काही दिवसांपूर्वी माझी रिप्लेसमेंट शोधा, मी राजीनाम्यावर ठाम असल्याचे म्हटले होते. तोच धागा पकडत आता राहुल गांधी जर त्यांचे पद सोडायला तयार असतील तर ते पद सांभाळण्याची माझी तयारी असल्याचे माजी केंद्रीय मंत्री आणि हॉकी ऑलिंपियन अस्लम शेर खान यांनी म्हटले आहे, मात्र त्यांचे हे म्हणणे काँग्रेसच्या नेत्यांनी गांभीर्याने घेतलेले नाही. काँग्रेस अध्यक्ष पदावर दावा करणारे खान हे पहिलेच काँग्रेसी नेता ठरले आहेत.

























































