
सामना ऑनलाईन, बंगळुरू
लोकसभेचं तिकीट मिळावं यासाठी सगळ्या पक्षातील मातब्बर नेते मंडळी प्रयत्न करत आहे. तिकीटासाठी पक्षांतर्गत संघर्ष देखील नवे नाहीत. कर्नाटकात काँग्रेस नेत्यांमध्ये तिकीटासाठी सुरू झालेला संघर्ष हीन पातळीवर येऊन पोहोचला आहे. इथल्या एका नेत्याने माझे प्रतिस्पर्ध्याशी नवरा बायकोसारखे संबंध असल्याचं म्हटलं होतं. या नेत्याला उत्तर देताना त्याच्या प्रतिस्पर्ध्याने मी पुरुषांसोबत झोपत नाही असं म्हटलं आहे.
Karnataka assembly speaker Ramesh Kumar on Congress leader KH Muniyappa’s reported remark ‘Ramesh Kumar and I are like husband and wife and we don’t have any issue(over LS tickets)’: I don’t sleep with men. I have a legal wife. So, he maybe interested but I am not. (21.3.19) pic.twitter.com/5fs4aXRQdc
— ANI (@ANI) March 22, 2019
कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष रमेश कुमार आणि के.एच.मुनिअप्पा यांच्यामध्ये लोकसभा तिकीटावरून रस्सीखेच सुरू आहे. मुनिअप्पा यांनी याबाबत बोलताना म्हटलं की मी आणि रमेश कुमार हे नवरा बायकोसारखे आहोत आणि आमच्यामध्ये कोणताही वाद नाहीये. या विधानामुळे रमेश कुमार संतापले असून त्यांनी मुनिअप्पांना उत्तर देताना म्हटलंय की ‘मी पुरुषांसोबत झोपत नाही, माझी बायको आहे. त्यांना माझ्यात रस असला तर माहिती नाही मात्र मला यात काहीही रस नाहीये’



























































