
दीपिका कक्कर ही टीव्हीवरील सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. ती बऱ्याच काळापासून छोट्या पडद्यापासून दूर असली तरी, ती तिच्या व्लॉग्सद्वारे तिच्या चाहत्यांशी सतत संवाद साधत असते. दीपिकाने अलीकडेच यकृताच्या कर्करोगाची शस्त्रक्रिया केली असून, सध्या ती शस्त्रक्रियेनंतर उपचार घेत आहे.
अलिकडेच एका यूट्यूब व्लॉगमध्ये, दीपिका तिच्या यकृताच्या कर्करोगाबद्दल चर्चा करताना खूपच भावनिक झाली. तिचा पती शोएब इब्राहिमसोबतच्या व्लॉगमध्ये, अभिनेत्रीने खुलासा केला की तिच्या चाचणीचे निकाल सामान्य असले तरी तिला अजूनही अस्वस्थ वाटते. तिने स्पष्ट केले की ती या कठीण काळात खंबीर राहण्याचा प्रयत्न करते, परंतु मन मात्र डगमगते, सतत भीती वाटत राहते..
14 तास नाॅनस्टाॅप कर्करोगाची शस्त्रक्रिया, दीपिका कक्करची भावूक पोस्ट
दीपिका म्हणाली, प्रत्येक दिवस काहीतरी नवीन घेऊन येतो आणि पुढे जाण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुढे जात राहणे. आम्ही तेच करण्याचा प्रयत्न करत आहोत. मी सध्या भावनिकदृष्ट्या खूप थकलेले आहे. सर्वकाही ठीक वाटत असले तरी माझ्या मनात अजूनही एक अनामिक भीती आहे.
दीपिका पुढे म्हणते, “पण सत्य हे आहे की, दररोज मी एका नवीन समस्येशी झगडत आहे. कधीकधी माझ्या थायरॉईडच्या पातळीत खूप चढ-उतार होत आहेत. इतकेच नाही तर, हार्मोनल बदलांचा शरीरावर अनपेक्षित परिणामही होत आहे. अधिक बोलताना ती म्हणाली, इतक्या गुंतागुंतींना सामोरे जाणे थकवणारे आहे. या सर्वांशी लढण्याचा एकमेव मार्ग म्हणजे पुढे जात राहणे. मी अजिबात या आजाराला जिंकू देणार नाही…




























































