शपथविधीनंतर अजित पवारांची पहिली प्रतिक्रिया

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
ajit-pawar

राज्यात राजकीय भुकंप आला आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सकाळीच मुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली असून राष्ट्रवादीच्या विधीमंडळाचे नेते अजित पवार यांनी उपमुख्यमंत्रिपदाची शपथ घेतली आहे. स्थिर सरकारसाठी आपण हा निर्णय घेतल्याचे अजित पवार यांनी सांगितले. परंतु अजित पवार यांनी पक्ष फोडला असा आरोप राष्ट्रवादी अध्यक्ष शरद पवार यांनी केला आहे.

त्यावर अजित पवार यांनी पहिली प्रतिक्रिया दिली आहे. योग्य वेळी भुमिका स्पष्ट करेन अशी पहिली प्रतिक्रिया अजित पवारांनी दिली आहे. एका मराठी वृत्तवाहिनीशी बोलताना अजित पवार म्हणाले की इतक्यात मी काही बोलणार नाही योग्य वेळी माझ्या सोयीन मी माझी भुमिका मांडेन असे अजित पवार यांनी स्पष्ट केले.