आता मी दिल्लीतून वापस नाही येणार; नितीन गडकरींनी स्पष्टच सांगितलं

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गाची हवाई पाहणी केल्यावर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी रत्नागिरी येथे पत्रकार परिषद घेतली. राज्यापेक्षा दिल्ली चागलं आहे का? असा प्रश्न विचारल्यानंतर नितीन गडकरी म्हणाले की, ‘हा… मी दिल्लीत जायला इच्छूक नव्हतो. पण गेलोय. आता मी दिल्लीतून वापस नाही येणार’, असं उत्तर दिलं.

राज्यातील सत्तांतरावर आपल्याला काय वाटतं असं विचारलं असता, माझा आज काल संबंध येत नाही. मी दिल्लीतच असतो, असंही ते म्हणाले.

कुणाची भिती?

राजकारणात सत्य, खरं बोलण्याची भिती वाटत नाही का? अशा आशयाच्या प्रश्नावर त्यांनी कुणाची भिती? असा प्रतिप्रश्न केला. तसंच मी जसा आहे तसा आहे. भिती कशाला वाटायची? माझा स्वभाव पहिल्यापासूनच तसा आहे, असंही गडकरी म्हणाले.

दरम्यान, मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्ग डिसेंबरपर्यंत खुला होईल, तसंच पावसाळ्याआधी एक मार्ग सुरू होईल, असं आश्वासन देखली गडकरींनी यावेळी दिलं.