मी लवकरच मैदानात परतेन – सूर्यकुमार

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सूर्यकुमार यादवच्या स्पोर्ट्स हर्नियावर जर्मनीच्या म्युनिक शहरात यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. गेल्या काही महिन्यांत सूर्यकुमारवर दुसरी शस्त्रक्रिया करण्यात आली असली तरी मी आयपीएलपूर्वी क्रिकेटच्या मैदानात परतेन, असा विश्वासही त्याने व्यक्त केला. त्याने आपल्या प्रकृतीबाबत नितांत काळजी व्यक्त करणाऱया चाहत्यांचे हितचिंतकांचे आभार मानले असून मी आता पूर्णपणे बरा असल्याचे त्याने ‘एक्स’वर सांगितले. सूर्यावर गेल्या वर्षी घोटय़ावर शस्त्रक्रिया करण्यात आली होती. आता स्पोर्ट्स हर्नियाच्या शस्त्रक्रियेनंतर त्याला किमान

महिनाभर विश्रांती घ्यावी लागणार आहे. फेब्रुवारीच्या मध्यापासून तो फिटनेससाठी मैदानात उतरेल आणि महिनाभरात स्वतःला फिट करत आयपीएलमध्ये उत्तुंग फटकेबाजी करून सर्वांचे मनोरंजन करील, असा विश्वासही त्याने बोलून दाखवला आहे.