‘मी मराठी शिकणार नाही, काय करायचं ते करा’ उद्योजक सुशील केडियाची मुजोरी

महाराष्ट्रातील मराठी भाषेच्या वादाने एका मोठ्या राजकीय आणि सांस्कृतिक वादाचे रूप धारण केले आहे. आता केडियानोमिक्सचे संस्थापक सुशील केडिया यांनी मराठीच्या वादात उडी घेतली आहे. त्यांच्या सोशल मीडियावर सार्वजनिकरित्या त्यांनी जाहीर केले आहे की, ते मराठी शिकणार नाहीत.

राज ठाकरे यांना एक्स वर टॅग करताना केडिया यांनी लिहिले की, गेली 30 वर्षे मुंबईत राहिल्यानंतरही मला मराठी भाषा फारशी कळत नाही. तसेच तुम्ही ज्या प्रकारे गैरवर्तन करत आहात, हे पाहता तुमच्यासारख्या लोकांना मराठी माणसांची काळजी घेण्याचं नाटक करण्याची परवानगी दिली जात राहील, तोपर्यंत मी मराठी शिकणार नाही, काय करायचं बोला? असं सुशील केडिया यांनी राज ठाकरे यांना आव्हान केलं आहे.

मीरा रोडवरील दुकानदाराने मराठीत बोलण्यास नकार दिल्याने मनसे कार्यकर्त्यांच्या एका गटाने त्याला चोप दिला होता. या घटनेचा व्हिडीओ व्हायरल झाल्यानंतर, केडिया यांचे हे विधान आले आहे.

मीरा भाईंदरमधील घटनेनंतर मराठी माणूस पेटून उठला, घेतला मोठा निर्णय

महाराष्ट्रात तुम्हाला मराठी बोलावेच लागेल असे केडियाला आता लोक सोशल मीडियावर सुनावत आहेत. मीरा भाईंदर परिसरामध्ये मराठी माणसांवर सध्याच्या घडीला होत असलेल्या अन्यायाविरुद्ध एकत्र येण्यासाठी आता मराठी माणूस पेटून उठला आहे. मराठी माणसाला घरे न देणे तसेच समाजात तेढ निर्माण करणे अशा विविध मार्गांनी मराठी समाजाला सतावले जात आहे. त्यामुळेच आता या अन्नायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी समस्त मराठीजन एकवटला आहे.