टी-20 क्रिकेट सामन्यांची संख्या वाढली ‘आयसीसी’कडून आकडेवारी जाहीर

269

आंतरराष्ट्रीय टी-20 क्रिकेट सामन्यांत मोठी वाढ झाल्याची आकडेवारीसह माहिती आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) जाहीर केली. संलग्न देशांमध्ये 2018 पासून खेळलेल्या सर्व टी-20 सामन्यांना आंतरराष्ट्रीय दर्जा बहाल करण्याच्या ‘आयसीसी’च्या निर्णयामुळे आणि जागतिक क्रमवारी सुरू केल्याने खेळावर त्याचा मोठा सकारात्मक परिणाम झाला आहे.

‘आयसीसी’ने दिलेल्या आकडेवारीनुसार 2018 व 2019 या वर्षांतील तुलनेत महिला द्विपक्षीय टी-20 सामन्यांमध्ये 110 टक्क्यांनी वाढ झाली आहे. याचबरोबर पुरुषांच्या टी-20 सामन्यांमध्येही 34 टक्के इतकी वाढ झाली आहे. 92 संलग्न सदस्य देशांपैकी 71 देशांनी टी-20 क्रिकेट खेळले. यात तब्बल 49 पुरुष संघांनी, तर 29 महिला संघांनी टी-20 क्रिकेटमध्ये पदार्पण केले. ‘आयसीसी’ने 50 लाख डॉलरहून अधिक बक्षिसे देताना 2019 मध्ये 23 जागतिक, विभागीय व उपविभागीय स्पर्धांचे आयोजन केले होते. यात 40 सदस्य संघांनी सहभाग घेऊन क्रिकेटच्या विकासासाठी मदत केली. या स्पर्धेमुळेच तीन असोसिएट सदस्य 2020 मध्ये कारकीर्दीतील पहिला टी-20 वर्ल्ड कप खेळणार आहेत. याचबरोबर नुकत्याच संपलेल्या युवा (19 वर्षांखालील) विश्वचषक स्पर्धेत जपान व नायजेरिया संघांनी सहभाग घेतला होता.

शिवसेना शाखा क्रमांक 203 आयोजित व नगरसेविका सिंधू मसुरकर यांच्या पुढाकाराने आयोजित करण्यात आलेल्या ‘साहेब चषक’ या स्पर्धेत रामदूत 11 या संघाने अजिंक्य होण्याचा मान संपादन केला. कुणाल इलेव्हन संघाला उपविजेते पदावर समाधान मानावे लागले. विजेत्या संघाला 51,111 रुपये व चषक देण्यात आला.

आपली प्रतिक्रिया द्या