ICC T20 WC 2026 – स्कॉटलंडची इटलीविरुद्ध दादागिरी

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

बांगलादेशच्या जागी अचानक लॉटरी लागलेल्या स्कॉटलंडने टी-20 क्रिकेट वर्ल्ड कपमध्ये प्रथमच खेळणाऱया इटलीविरुद्ध दादागिरी दाखवत त्यांचा 73 धावांनी धुव्वा उडवला आणि आपला वर्ल्ड कप विजयारंभ केला. ‘क’ गटातील या एकतर्फी लढतीत स्कॉटलंडने पूर्ण वर्चस्व दाखवताना स्पर्धेत सर्वप्रथम द्विशतकी टप्पा गाठण्याचा मान मिळवला आणि नंतर इटलीचा 134 धावांत डाव गुंडाळला. स्कॉटलंडच्या विजयात मायकल लीस्कच्या अष्टपैलू खेळाने 5 चेंडूंत नाबाद 22 धावांची वादळी खेळी आणि 17 धावांत 4 विकेट टिपण्याचा पराक्रम केला.

स्कॉटलंडने 208 धावांचे आव्हान दिले तेव्हाच इटलीचा पराभव निश्चित झाला होता. वर्ल्ड़ कपचा पहिलाच सामना खेळत असलेल्या इटलीकडून फार मोठय़ा कामगिरीची अपेक्षाच नव्हती आणि त्यांचा संघ  16.4 षटकांत केवळ 134 धावांतच गारद झाला. मधल्या फळीतील बेन मॅनेंटीने 52 धावांची झुंज देत काही काळ प्रतिकार केला. त्याने 31 चेंडूंत 5 चौकार आणि 1 षटकार ठोकला. हॅरी मॅनेंटी (37) आणि जेजे स्मट्स (22)या दोघांनी इटलीच्या डावाला काहीसा आधार दिला. त्यामुळे इटली शंभरी गाठण्यात यशस्वी ठरली. स्कॉटलंडकडून लीस्कने 4 विकेट्स घेत इटलीच्या फलंदाजांना उभेच राहू दिले नाही.

ICC T20 WC 2026 – पाकिस्तानने गुडघे टेकले! मागण्या धुडकावून लावताच पीसीबीची शरणागती