
आयसीसीने आगामी महिला टी-20 वर्ल्ड कपमध्येही क्रिकेटची व्रेझ वाढावी म्हणून हिंदुस्थान आणि पाकिस्तान यांच्यात महामुकाबला ठेवला आहे. पुरुषांच्या वर्ल्ड कपप्रमाणे महिलांच्या क्रिकेटमध्येही या दोन्ही संघांना एकाच गटात ठेवण्यात आले असून 14 जूनला ही लढत रंगणार असल्याचे आयसीसीने जाहीर केले. हा वर्ल्ड कप 12 जून ते 5 जुलैदरम्यान इंग्लंड आणि वेल्समध्ये रंगणार आहे.
युरोपचे चार संघ खेळणार
नेपाळमधील पात्रता फेरीनंतर 12 संघ निश्चित झाले असून इंग्लंड, आयर्लंड, स्का@टलंड आणि नेदरलँड्स या चार युरोपीय संघांमुळे स्पर्धेला नवे परिमाण लाभले आहे. हे संघ क्रिकेटच्या कसोटी संघांचा दर्जा असलेल्या संघांशी दोन हात करतील. या स्पर्धेत एपंदर 12 संघ खेळणार असून ‘अ’ गटात हिंदुस्थानसह ऑस्ट्रेलिया, दक्षिण आफ्रिका, पाकिस्तान, बांगलादेश आणि नेदरलँड्स हे असतील तर ‘ब’ गटात वेस्ट इंडीज, इंग्लंड, न्यूझीलंड, श्रीलंका, आयर्लंड, आणि स्का@टलंड हे संघ खेळतील.
हिंदुस्थानची सलामी पाकिस्तानशी
हिंदुस्थानचा सलामीचा सामना पाकिस्तानशी 14 जूनला होईल तर 21 जूनला दक्षिण आफ्रिकेशी (ओल्ड ट्रफर्ड), 25 जूनला बांगलादेशशी आणि 28 जूनला ऑस्ट्रेलियाशी भिडेल. स्पर्धेचा उद्घाटन सामना 12 जूनला इंग्लंड-श्रीलंका (एजबेस्टन) यांच्यात होईल आणि उपांत्य फेरी 30 जून आणि 2 जुलैला रंगेल. अंतिम सामन्याचा थरार 5 जुलैला लॉर्ड्सवर अनुभवता येईल. वन डे विश्वविजयानंतर हिंदुस्थानचे लक्ष्य आता पहिल्या टी-20 किताबावर असले. इंग्लंडच्या मैदानांवर रंगणारा हा जल्लोष महिला क्रिकेटच्या नव्या युगाची नांदी ठरणार आहे.






























































