
सामना ऑनलाईन ।लंडन
बुधवारपासून हिंदुस्थानविरुद्ध सुरू होत असलेल्या कसोटी मालिकेतील सलामीची लढत इंग्लंडसाठी ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाची असेल. कारण इंग्लंडचा हा एक हजारावा कसोटी सामना असणार आहे. एक हजार कसोटी खेळणारा पहिला देश ठरण्याच्या उंबरठ्यावर असलेल्या इंग्लंड संघाला आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने (आयसीसी) शुभेच्छा दिल्या आहेत.





























































