INDW vs AUSW – जेमिमाचा शतकी तडाखा; हिंदुस्थानचा ऐतिहासिक पाठलाग, अंतिम फेरीत धडक

नवी मुंबईमध्ये टीम इंडियाच्या नावाचा जयघोष घुमला आणि त्याला कारण ठरली जेमिमा रोड्रिग्ज. पहिल्या दोन विकेट झटपट पडल्यानंतर चाहत्यांची धाकधुक वाढली होती. परंतु कर्णधार हरमनप्रीत कौरच्या मदतीने जेमिमाने खिंड लढवली. हरमनप्रीत कौर 89 धावांची धमाकेदार खेळी करून माघारी परतली. मात्र जेमिमा शड्डू ठोकून टिकून राहिली आणि तिने धुवांधार फलंदाजी करत नाबाद 127 धावांची ऐतिहासिक खेळी केली. पाच गड्यांच्या मोबदल्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाने दिलेल्या 339 धावांच्या आव्हानाचा यशस्वी पाठलाग केला आणि तिसऱ्यांदा वर्ल्ड कप फायनलमध्ये धडक मारली आहे.