वर्ल्डकप इतिहासाची सफर – 1979 मध्ये विंडीज सलग दुसऱ्यांचा विश्वविजेता

68
1979 - इंग्लंडचा 92 धावांनी दणदणीत पराभव करत वेस्ड इंडीज दुसऱ्यांचा विजेता बनला

सामना ऑनलाईन । मुंबई

1975 मध्ये पहिल्या विश्वचषकावर नाव कोरलेल्या बलाढ्य वेस्ट इंडिजने क्रिकेटच्या महाकुंभातील दुसरा विश्वचषकही उंचावला. दुसरा विश्वचषक 9 जून ते 23 जून या दरम्यान इंग्लंडमध्ये खेळला गेला आणि यात आठ संघांनी सहभाग घेतला होता. पहिल्या विश्वचषकाप्रमाणे आठ संघाची दोन गटात विभागणी करण्यात आली होती. तसेच खेळाडूंचा पोषाखही पांढरा होता आणि 60 षटकांच्या या लढतींमध्ये लाल चेंडूचा वापर करण्यात आला होता.

1979-wc

विश्वचषकामध्ये सहभागी झालेल्या आठ संघाची अ गट आणि ब गटामध्ये विभागणी करण्यात आली होती. अ गटामध्ये इंग्लंड, पाकिस्तान, ऑस्ट्रेलिया आणि कॅनडा आणि ब गटामध्ये वेस्ट इंडिज, श्रीलंका, न्यूझीलंड आणि हिंदुस्थान या संघाचा समावेश होता. पहिल्या वर्ल्डकपमध्ये पूर्व आफ्रिकेचा संघ सहभागी झाला होता, परंतु दुसऱ्या वर्ल्डकपमध्ये तो संघ सहभागी झाला नव्हता. दोन गटांमध्ये झालेल्या लढतीतून बादफेरीमध्ये अ गटातून इंग्लंड आणि पाकिस्तान तर ब गटातून वेस्ट इंडिज आणि न्यूझीलंडचा संघ पोहोचला होता. विषेश म्हणजे पहिल्या विश्वचषकामध्ये अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेला ऑस्ट्रेलियाचा संघ बाद फेरीतून बाहेर पडला होता.

हिंदुस्थानच्या कामगिरीत घसरण
श्रीनिवासराघवन वेंकटराघवन यांच्या नेतृत्वाखाली सलग दुसऱ्यांदा विश्वचषक खेळणाऱ्या हिंदुस्थानच्या संघाच्या कामगिरीमध्ये घसरण झाली. अ गटामध्ये असणाऱ्या हिंदुस्थानला बाद फेरीमध्ये एकही सामना जिंकता आला नाही. पहिल्या विश्वचषकामध्ये हिंदुस्थानने किमान एक सामना जिंकला होता, परंतु दुसऱ्या विश्वचषकात तिन्ही सामने हिंदुस्थानने गमावले.

रिचर्डस यांचे शतक आणि वेस्ट इंडिजचा विजय
सेमीफायनलमध्ये इंग्लंडने न्यूझीलंड आणि वेस्ट इंडिजने पाकिस्तानवर विजय मिळवून अंतिम फेरीत स्थान मिळवले. इंग्लंडने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी घेतली. वेस्ट इंडिजने 60 षटकांमध्ये 9 बाद 286 धावा केल्या. विंडीजकडून व्हीव्हीएन रिचर्डस यांनी 157 चेंडूत 11 चौकार आणि 3 षटकारांसह 138 धावा चोपल्या. यानंतर विंडीजच्या गोलंदाजांनी धारधार गोलंदाजी करत इंग्लंडचा डाव 194 धावांमध्ये गुंडाळला आणि 92 धावांनी मोठा विजय मिळवला. अंतिम सामन्यात दणदणीत शतक ठोकणाऱ्या रिचर्डस यांना सामनावीरचा किताम मिळाला.

vivian-richardson

दुसऱ्या वर्ल्डकपमधील लक्षात राहणाऱ्या गोष्टी –
– या स्पर्धेत सर्वाधिक धावसंख्या रचण्याचा मान विजेत्या वेस्ट इंडिजला मिळाला. वेस्ट इंडिजने सेमीफायनलमध्ये पाकिस्तानविरुद्ध 6 बाद 293 धावा चोपल्या.

– एकीकडे वेस्ट इंडिजने सर्वाधिक धावांचा विक्रम केला, तर कॅनडाने नीचांका धावसंख्या नोंदवली. 14 जून, 1979 ला झालेल्या सामन्यात इंग्लंडने कॅनडाचा डाव अवघ्या 45 धावांमध्ये गुंडाळला होता.

– विश्वविजेच्या संघाचा फलंदाज गॉर्डन ग्रीनिज यांनी या स्पर्धेत सर्वाधिक धावा केल्या होत्या. त्यांनी 4 सामन्यात 253 धावा केल्या, तर रिचर्डस यांनी 4 सामन्यात 217 धावा केल्या.

garden-grinij

– फलंदाजीत वेस्ट इंडिजचे खेळाडू आघाडीवर होते, तर गोलंदाजीत इंग्लंडच्या माईक हेन्ड्रिक यांनी बाजी मारली होती. त्यांनी या स्पर्धेत 5 सामन्यातून एकूण 10 बळी घेतले.

आपली प्रतिक्रिया द्या