
हिंदुस्थानी महिला क्रिकेट संघाला प्रथमच एकदिवसीय क्रिकेटचे जगज्जेतेपद जिंकून देणाऱया रणरागिणींचा सन्मान सोहळा पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपल्या निवासस्थानी करत त्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारली. तसेच पंतप्रधानानी प्रत्येक खेळाडूशी आपुलकीने संवाद साधत त्यांना फिट इंडिया मोहीमेसाठी पुढाकार घेण्याचे आवाहनही केले. याप्रसंगी जगज्जेती कर्णधार हरमनप्रीत कौरने आम्हाला जगज्जेतेपदाच्या करंडकासह वारंवार भेटायला आवडेल, असेही विश्वासाने सांगितले. तसेच तिने पंतप्रधानाना नमो नावाची जर्सीही भेट दिली.


























































