
ICICI बँकेने खातेधारकांना मोठा दिलासा दिला आहे. बँकेने खातेधारकांसाठी किमान शिल्लक मर्यादा वाढवली होती. मात्र, आता ती कमी करण्यात आली आहे. याबाबत बँकेकडून माहिती देण्यात आली आहे. आता बचत खात्याच्या किमान खाते शिल्लक (एमएबी) चे नियम पुन्हा बदलण्यात आले आहेत. ग्राहकांना दिलासा देत ही मर्यादा महानगर आणि शहरी भागात ५०,००० रुपयांवरून फक्त १५,००० रुपये करण्यात आली आहे.
एकीकडे महानगर आणि शहरी भागात बचत खात्यातील किमान मासिक सरासरी शिल्लकची (MAB) मर्यादा बदलण्यात आली आहे. आता अर्ध-शहरी भागात ती 25000 रुपयांवरून 7,500 रुपये आणि ग्रामीण भागात 10000 रुपयांवरून 2500 रुपये करण्यात आली आहे. ग्राहकांनी खात्यात निश्चित मर्यादेपेक्षा कमी शिल्लक ठेवली तर त्यांना दंड भरावा लागेल, असेही बँकेने स्पष्ट केले आहे.
अलिकडेच आयसीआयसीआय बँकेने आपले नियम बदलताना बचत खात्यातील किमान रक्कम किंवा किमान सरासरी रक्कम शिल्लक मर्यादा वाढवली होती. पूर्वीच्या तुलनेत ती 5 पट वाढवण्यात आली होती. या बदलानंतर खात्यात 10000 रुपयांऐवजी किमान 50000 रुपये ठेवणे अनिवार्य करण्यात आले होते. बँकेने स्पष्ट केले होते की किमान रकमेशी संबंधित हे बदल फक्त त्या खात्यांवर लागू केले जात आहेत. बँकेच्या या निर्णयाला खातेधारकांकडून विरोध होता.
ग्राहकांच्या विनंतीच्या आधारे किमान शिल्लक मर्यादा कमी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. वाढलेली मर्यादा 1 ऑगस्टपासून लागू करण्यात आली होती. आता कमी केलेली मर्यादा त्याच तारखेपासून लागू करण्यात आली आहे. ही नवीन मर्यादा पगार खाती, ज्येष्ठ नागरिक आणि पेन्शनधारकांच्या खात्यांवर लागू होणार नाही. मात्र, 31 जुलैपूर्वी उघडलेल्या बँक खात्यांसाठीही हा नवीन नियम लागू होणार नाही.
वाढलेली एमएबी मर्यादा कमी करण्याचा आयसीआयसीआय बँकेचा निर्णय खातेधारकांसाठी दिलासादायक आहे. नवीन मर्यादेसह जुना दंड नियम लागू राहील. एखाद्या ग्राहकाने खात्यात आवश्यक किमान शिल्लक राखण्यात अयशस्वी झाला तर किमान शिल्लक रकमेच्या 6 टक्के किंवा 500 रुपये, यापैकी जे कमी असेल ते आकारले जाईल. मात्र, कुटुंब बँक खातेधारक आणि पेन्शनधारकांच्या खात्यांना या शुल्कातून सूट देण्यात आली आहे.