
रेल्वेची एनटीपीसी परीक्षा देणाऱ्या उमेदवारांकडून रेल रोको आणि निदर्शने करण्याचे प्रकार होत असल्याने रेल्वे मंत्रालयाने अशा उमेदवारांवर सक्त कारवाई करण्याचा इशारा देत भविष्यात त्यांना रेल्वेची नोकरी न देण्याचा निर्णय घेतला आहे. रेल्वेची परीक्षा सुरू असून यासंदर्भात जागोजागी संधी न मिळालेले उमेदवार रेल रोको अन्य मार्गांनी आंदोलन करीत आहेत. अशा प्रकारे आंदोलन करणे गैरशिस्तीत बसत असून रेल्वेने यासंदर्भात अशा नोटीस जारी करीत अशा आंदोलनांचे व्हिडिओ रेकॉर्डिंग केले जात असून अशा उमेदवारांना ओळखून त्यांना नोकरीच्या शयर्तीतून कायमचे बाद करण्याचा निर्णय घेतला आहे.





























































