चीनचे दहा तुकडे झाल्यास जगाचा धोका टळेल; निर्वासित चिनी लेखकाचा दावा

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा
china-flag-new

सामना ऑनलाईन । पॅरिस

आर्थिक महासत्ता झालेला चीन हा संपूर्ण जगासाठी धोकादायक झालेला असून त्याचे दहा तुकडे झाले तर मानवजातीसाठी ते चांगले ठरेल असे वक्तव्य चिनी लेखक लियाओ यिवू यांनी केले आहे.

लियाओ थिवू हे चीनमधील थियानमेन चौकात झालेल्या आंदोलनावर कविता लिहिल्यामुळे जेलमध्ये जाऊन आले आहेत. लियाओ थिवू यांनी बॉल्स ऑफ ओपियम नामक पुस्तक लिहिले आहे. या पुस्तकाचे फ्रान्समध्ये प्रकाशन झाले. या पुस्तकात बीजिंगच्या थियानमेन चौकात 1989 मध्ये झालेल्या आंदोलकांना लष्कराने चिरडून टाकले, ठार मारले होते त्याची कहाणी या पुस्तकात आहे. चीनमध्ये या पुस्तकावर तत्काळ बंदी घालण्यात आली. हा नरसंहार 4 जूनची घटना या नावाने ओळखली जाते. चीनच्या इतिहासावर हा एक डाग आहे असे लियाओ थिवू यांचे म्हणणे आहे.