असं झालं तर… शाळेचा दाखला हरवला तर…

दहावी, बारावीनंतर शाळा किंवा कॉलेजमधून ओरिजन टीसी काढल्यानंतर बऱ्याचदा ती प्रवासात हरवली जाते. शाळेचा दाखला हरवल्यास काय करावे कळत नाही.

तुमचे शाळा सोडल्याचे प्रमाणपत्र म्हणजे ओरिजनल टीसी हरवली तर जास्त घाबरून जाण्याची गरज नाही. मुलाकडून हरवल्यास रागावू नका.

सर्वात आधी ज्या शाळा किंवा शिक्षण संस्थेतून टीसी काढली आहे, त्या शाळेत डय़ुप्लिकेट टीसीसाठी अर्ज करा. टीसी हरवल्याची तक्रार पोलीस स्टेशनला करा.

पोलीस स्टेशनला गेल्यावर शाळेचे नाव, रोल नंबर आदी माहिती सांगा. पोलीस स्टेशनमधून तक्रार दाखल केल्याची प्रत घ्या. आवश्यक वाटल्यास प्रतिज्ञापत्र द्या.

पोलीस स्टेशनमधील तक्रार अर्ज शाळेत द्या, त्यासोबत एक साध्या कागदावर टीसीसाठी अर्ज करा. अर्जाची पडताळणी करून शाळा-महाविद्यालय तुम्हाला डय़ुप्लिकेट टीसी देतील.