
बँकेत खाते उघडल्यानंतर चेकबुक दिले जाते. परंतु, कधीकधी चुकून चेकबुकवरचं नाव किंवा स्पेलिंग चुकीचं होतं. त्यामुळे पुढे अडचण निर्माण येते.
जर तुमच्या बाबतीत असं काही झालं असेल तर तुम्हाला नेमकं काय करावं लागेल. त्यामुळे सर्वात आधी बँकेत जाऊन नवीन चेकबुक देण्याची विनंती करा.
तुम्ही बँकेला यासंबंधी माहिती देऊ शकता. तसेच नवीन चेकबुकसाठी तत्काळ अर्ज करता येऊ शकतो. काही दिवसांनी तुम्हाला नवीन चेकबुक मिळेल.
चेकबुकमधील नावात किरकोळ चूक असेल तरीही चेक नाकारला जाऊ शकतो. तसेच पडताळणीला खूप वेळ लागू शकतो. त्यामुळे ही छोटी चूक महागात पडू शकते.
चुकीच्या नावामुळे चेक कॅश करताना किंवा जमा करताना समस्या येऊ शकतात. त्यामुळे शक्य असल्यास चेक बदलणे चांगले राहील.