
हिरव्या मिरच्या केवळ पदार्थांना तिखटपणा देत नाहीत, तर पदार्थांना एक विशिष्ट चव देखील देतात, त्यासोबत ते तुमच्या आरोग्यासाठी फायदेशीर असतात. हिरव्या मिरच्यांचा तिखटपणा त्यात असलेल्या कॅप्सेसिनमुळे येतो, ज्यामुळे त्वचेवर जळजळ आणि उबदारपणा जाणवतो. देठाजवळील मिरचीचा पांढरा भाग विशेषतः जास्त तीखट असतो. हिरव्या मिरची कापल्यावर त्याचा तीखटपणा त्वचेला लागुन जळजळ होऊ शकते. यापासून आराम मिळवण्यासाठी, तुम्ही घरगुती सोप्या पद्धतींचा अवलंब करू शकता. जाणुन घ्या
दूध
तुम्हाला मिरच्यांमुळे हातावर जळजळ होत असेल तर दूध हा सर्वोत्तम पर्याय आहे. मिरची कापल्यानंतर हात जळजळत असेल तर थंड दुधाच्या भांड्यात हात बुडवा. तिखटपणामुळे होणाऱ्या जळजळपासुन आराम मिळतो. पर्यायी म्हणून, तुम्ही दुधाची साय सुद्धा हाताला लावू शकता, यामुळे लगेच आराम मिळेल.
अॅलोवेरा
बहुतेक घरांमध्ये कोरफडचे झाड असते, जे त्वचेपासून केसांपर्यंत सर्व गोष्टींसाठी वापरले जाऊ शकते. मिरच्यांच्या तीखटपणामुळे हाताची जळजळ होत असेल तर अॅलोवेरा जेल लावा किंवा अॅलोवेरा चे दोन भाग करुन एक भाग हातावर जळजळत्या भागावर लावा. किरकोळ भाजणे आणि जखमांवरही कोरफडचा वापर फायदेशीर आहे.
लिंबाचा रस
मिरच्यांचा तिखटपणा कमी करण्यासाठी लिंबू खूप प्रभावी आहे. मिरच्यांमुळे तुमचे हात जळत असतील तर लिंबाचा रस लावणे देखील फायदेशीर ठरू शकते.
घरात वापरले जाणारे ‘हे’ तेल मदत करतील
हिरव्या मिरच्या किंवा कोणतीही तीखट चटणी वाटल्यामुळे हाताला जळजळ होत असेल तर नारळाचे तेल किंवा ऑलिव्ह ऑइल लावल्याने आराम मिळू शकतो. याशिवाय, देशी तूप जळजळ कमी करण्यासाठी फायदेशीर आहे .