सात आश्चर्यांपैकी एक पॅरीसचा आयफेल टॉवर पर्यटकांसाठी बंद

87

सामना ऑनलाईन । पॅरीस

जगातील सात आश्चर्यांपैकी एक असलेले फ्रान्सचे आयफेल टॉवर अनिश्चित काळासाठी पर्यटकांसाठी बंद करण्यात आला आहे. सोमवारी एक संशयित व्यक्ती आयफेल टॉवरजवळ आढळून आला. यानंतर सावधगिरी म्हणून सुरक्षारक्षकांना हा टॉवर रिकामा केला. आयफेल टॉवरसह चँप टी मार्स स्मारक देखील पर्यटकांसाठी बंद करण्यात आले आहे. फ्रान्सच्या स्थानिक प्रसारमाध्यमांना याबाबत वृत्त दिले आहे.

फ्रान्सची राजधानी पॅरीसमध्ये असणाऱ्या जगप्रसिद्ध आयफेल टॉवरजवळ एका संशयित तरुणाला पाहिल्यानंतर टॉवरसह आसपासचा परिसर खाली करण्यात आला. याबाबत स्मारक समितीने आपल्या अधिकृत ट्विटर अकाऊंटवर माहिती दिली असून पुढील सुचना मिळेपर्यंत आयफेल टॉवर आणि परिसर पर्यटकांसाठी बंद राहिल असे म्हटले आहे. तसेच पर्यटकांनी आपली भेट सध्या स्थगित करावी असेही आवाहन करण्यात आले आहे.

आयफेल टॉवर 1889 मध्ये बनवण्यात आला. तेव्हापासून फ्रान्स म्हणजे आयफेल टॉवर असे समिकरण झाले. जगभरातील फिरस्त्या लोकांना या ठिकाणाची भूरळ पडत असते. या ठिकाणी दरवर्षी जवळपास 50 लाखांपेक्षा जास्त पर्यटक भेट देतात.

आपली प्रतिक्रिया द्या