
आयटीआय अभ्यासक्रमासाठी ऑनलाईन प्रवेश अर्ज सादर करण्याची अंतिम मुदत वाढविण्यात आली आहे. आता विद्यार्थ्यांना 21 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजेपर्यंत अर्ज करता येणार आहे. या प्रकेशाचे सुधारित वेळापत्रक आयटीआयच्या वेबसाईटवर उपलब्ध वरून देण्यात आले आहे.
राज्यातील खासगी आणि सरकारी आयटीआयमध्ये जागांसाठी प्रवेश प्रक्रिया 1 ऑगस्टपासून सुरू झाली. अर्ज भरण्याची मुदत 14 ऑगस्टपर्यंत होती. या प्रवेशाची प्राथमिक गुणवत्ता यादी 25 ऑगस्ट रोजी सकाळी 11 वाजता जाहीर होणार आहे. विद्यार्थ्यांना 26 ऑगस्टपर्यंत सायंकाळी 5 वाजेपर्यंत हरकती नोंदविता येणार आहे. प्रवेशाची पहिली फेरी 30 ऑगस्ट रोजी सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल. दुसरी प्रवेश फेरीसाठी विद्यार्थ्यांना 1 ते 5 सप्टेंबर या कालावधीत संस्थानिहाय प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. या फेरीची यादी 9 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता जाहीर होईल.
तिसऱया फेरीसाठी 10 ते 15 सप्टेंबर या कालावधीत विद्यार्थ्यांना प्राधान्यक्रम सादर करावे लागतील. 18 सप्टेंबरला सायंकाळी 5 वाजता निवड यादी जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 19 ते 23 सप्टेंबर या कालावधीत प्रवेश घेता येणार आहे. चौथ्या फेरीसाठी 19 ते 24 सप्टेंबरदरम्यान प्राधान्य भरता येतील. या प्रवेशाची यादी 28 सप्टेंबरला जाहीर होईल. विद्यार्थ्यांना 29 सप्टेंबर ते 3 ऑक?टोबर या कालावधीत प्रवेश निश्चित करावा लागेल. प्रवेश प्रक्रिया संपल्यानंतर 5 ऑक्टोबरपासून जिल्हास्तरावर समुपदेशन फेरी राबविण्यात येणार आहे.
























































