जगातील ‘टॉप 50’ इंजिनीयरिंग संस्थांमध्ये पवईची आयआयटी मुंबई

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सर्वोत्कृष्ट विद्यापीठांच्या जागतिक क्रमवारीमध्ये इंजिनीयरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी वर्गात पवई येथील आयआयटी मुंबईने ‘टॉप 50’मध्ये स्थान मिळवले आहे. या क्रमवारीत आयआयटी मुंबईने देशात पहिला क्रमांक पटकावला आहे.

क्यूएस वर्ल्ड युनिव्हर्सिटी रॅकिंग आज घोषित करण्यात आली. त्यात इंजिनीयरिंग ऍण्ड टेक्नॉलॉजी वर्गात आयआयटी मुंबईने जगात 44 वा तर आयआयटी दिल्लीने 47 वा क्रमांक पटकावला आहे. आयआयटी दिल्लीने यंदाच्या क्रमवारीत गतवर्षीपेक्षा 14 क्रमांकावर मजल मारली आहे. गेल्या वर्षी या क्रमवारीत आयआयटी दिल्लीचा 61 वा क्रमांक होता.

अमेरिकेतील मॅसाच्युसेटस् इन्स्टिटय़ूट ऑफ टेक्नॉलॉजी आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठाने या क्रमवारीत अनुक्रमे पहिला व दुसरा क्रमांक पटकावला. इंग्लंडचे केंब्रिज विद्यापीठ तिसऱया क्रमांकावर आहे. हिंदुस्थानातील आयआयटी खरगपूर (86), आयआयटी मद्रास (88) आणि आयआयटी कानपूर (96) यांनी ‘टॉप 100’ मध्ये स्थान मिळवले.

या क्रमवारीमध्ये जगातील 159 शहरांमधील 1368 विद्यापीठांचा विविध 48 वर्गांमध्ये समावेश आहे. त्यात हिंदुस्थानातील 165, अमेरिकेतील 441, इंग्लंड, जर्मनी आणि फ्रान्समधील एकूण 502 तर चीन, जपान आणि दक्षिण कोरियातील 360 शिक्षणसंस्था आहेत.