
सामना ऑनलाईन, गुंटूर
आयआयटी हैद्राबादमध्ये शिकणाऱ्या एका हुशार विद्यार्थ्याचा दुर्दैवी अंत झाला आहे. मोबाईल बोलण्याच्या नादात हा विद्यार्थी सातव्या मजल्यावरून खाली पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला. मोबाईलवर बोलण्याच्या नादात भान न राहणाऱ्या मंडळींसाठी ही इशारा देणारी घटना आहे.
या विद्यार्थ्याचे नाव अनिरूद्ध असून तो 22 वर्षांचा होता. तो मेकॅनिकल आणि एअरोस्पेस इंजिनिअरींगच्या चौथ्या वर्षाचा अभ्यास करत होता. शुक्रवारी रात्री 12.45 च्या सुमारास मित्रांशी बोलण्यासाठी अनिरूद्ध गच्चीवर गेला होता. मित्राशी गप्पा मारताना त्याचा तोल गेला आणि तो सातव्या मजल्यावर कोसळला. सुरुवातीला पोलिसांना ही आत्महत्या वाटत होती मात्र सीसीटीव्ही तपासल्यावर अनिरुद्धचा तोल गेल्यानेच त्याचा मृत्यू झाल्याचं पोलिसांना कळालं.





























































