आयटीआय विद्यार्थ्यांना पाचशे रुपये विद्यावेतन तीन महिन्यांत अंमलबजावणीचे मंत्र्यांचे आश्वासन

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

राज्यातील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील (आयटीआय) किद्यार्थ्यांचे विद्यावेतन 40 रुपयांवरून 500 रुपये करण्यात येणार आहे. येत्या तीन महिन्यांत विद्यावेतन लागू करण्यात येईल, अशी माहिती कौशल्य, रोजगार मंत्री मंगलप्रभात लोढा यांनी विधान परिषदेत दिली.

सदस्यांनी औद्योगिक प्रशिक्षण संस्थेतील किद्यार्थ्यांच्या विद्यावेतनात काढ करण्याबाबत प्रश्न उपस्थित केला होता. त्याला उत्तर देतांना लोढा बोलत होते. खासगीच्या तुलनेत शासकीय आयटीआयचे प्रवेश शुल्क कमी आहे. विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्याचा प्रयत्न सुरू आहे. औद्योगिक प्रशिक्षण संस्था बळकट करून 100 टक्के प्रवेश होण्यासाठी राज्य शासन प्रयत्न करीत आहे. मागणीनुसार एमआयडीसी आणि उद्योगपूरक अभ्यासक्रम सुरू करण्याची कार्यवाही सुरू आहे. स्थानिक कुशल कामगार आणि आयटीआयमधील शिक्षकांना प्रशिक्षण दिले जाईल, असेही लोढा यांनी यावेळी सभागृहात सांगितले.

या चर्चेत सदस्य एकनाथ खडसे, प्रवीण दरेकर, सतीश चव्हाण, सचिन अहिर, शशिकांत शिंदे, श्रीकांत भारतीय, अरुण लाड आदींनी सहभाग घेऊन उपप्रश्न उपस्थित केले होते.

आयटीआयचे नूतनीकरण करणार

राज्यात 419 औद्योगिक प्रशिक्षण संस्था (आयटीआय) आहेत. तेथील या विद्यार्थ्यांना चांगल्या सुविधा देण्यासाठी आयटीआयचे नूतनीकरण करण्याचा निर्णय राज्य शासनाने घेतला आहे. यासाठी 1200 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. यातून आभासी कर्ग (क्हर्च्युअल क्लास रूम), ग्रंथालय, जीम अशा किकिध सुकिधा देण्यात येतील असेही त्यांनी स्पष्ट केले.