गोरेगावमध्ये अनधिकृत बांधकामांवर हातोडा

436

पालिकेच्या ‘पी दक्षिण’ विभागातील गोरेगाव पश्चिम परिसरातील नया नगर नाल्यालगत असणाऱ्या तब्बल 70 अनधिकृत बांधकामांवर पालिकेने आज धडक कारवाई केली. पालिकेच्या  या कारवाईमुळे गेल्या चार वर्षांपासून रखडलेल्या नया नगर नाल्याच्या रुंदीकरणाचा मार्ग मोकळा झाला आहे.

पालिकेने केलेल्या या कारवाईमुळे नया नगर नाल्याच्या रुंदीकरणामुळे बेस्ट नगर, नया नगर आदी लगतच्या परिसरांमध्ये पावसाच्या पाण्याचा निचरा अधिक वेगाने होण्यास मदत होणार आहे. शिवाय नाल्यालगत असणाऱ्या तीन मीटर रुंदीच्या रस्त्याचे कामही मार्गी लागणार आहे. ‘परिमंडळ -4’ चे उपायुक्त पराग मसुरकर यांच्या मार्गदर्शनात ‘पी दक्षिण’ विभागात अनधिकृत बांधकामांवर धडक कारवाई करण्यात येत आहे.

बुधवार-गुरुवारी करण्यात आलेल्या कारवाईसाठी महापालिकेच्या 50 कामगारांसह बांगूर नगर पोलीस ठाण्यातील 30 पोलीस कर्मचारीदेखील घटनास्थळी तैनात होते. या कारवाईसाठी दोन जेसीबी, दोन डंपर यासह गॅस कटर, हातोडा यासारखी अवजारेही वापरण्यात आल्याची माहिती सहायक आयुक्त देवीदास क्षीरसागर यांनी दिली.

आपली प्रतिक्रिया द्या