शिरोळ तालुक्यातील दानोळीत लाखाची गावठी दारू नष्ट; उत्पादन शुल्क विभागाचा छापा

721

शिरोळ तालुक्यातील दानोळी येथे राज्य उत्पादन शुल्कच्या इचलकरंजी विभागाने छापा टाकून गावठी दारूच्या कच्च्या रसायनासह 94 हजार 50 रूपयांचा मुद्देमाल नष्ट केला. या कारवाईत 18 लोखंडी पिंपे, चार प्लास्टिक पिंपे, 10 होज पाईप, 10 प्लॅस्टिक पिशव्या व चार हजाराचे कच्चे रसायन असा एकूण 94 हजार 50 रूपये किंमतीचा मुद्देमाल जप्त करून नष्ट करण्यात आला. ही कारवाई विभागीय उपायुक्त वाय. एम. पवार, अधीक्षक गणेश पाटील, उपाधीक्षक बी. आर. चौगुले यांच्या मार्गदर्शनाखाली निरीक्षक पी.आर. पाटील, दुय्यम निरीक्षक शिवाजी कोरे, अतुल पाटील, सहाय्यक दुय्यम निरीक्षक गणपती हजारे, जवान विजय माने, सुभाष कोल्हे, विलास पवार आदिंच्या पथकाने केली. अशा प्रकारे अवैध मद्य साठ्यांवर कारवाई सुरुच ठेवणार असल्याचे निरीक्षक पी. आर. पाटील यांनी सांगितले.

आपली प्रतिक्रिया द्या