रत्नागिरीत लॉकडाऊनमध्ये मटका सुरू; सोशल डिस्टन्सिंगचे तीनतेरा

731

लॉकडाऊनच्या काळात अनेक व्यवसाय बंद असताना अवैध धंदे चोरीछुप्या मार्गाने सुरू आहेत. लॉकडाऊनच्या काळात रत्नागिरीत मटक्याचा धंदा तेजीत सुरू आहे. चोरीछुप्या मार्गाने मटका सुरू झाल्याने सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला आहे. त्यामुळे कोरोना फैलावाची भीती व्यक्त होत आहे.

लॉकडाऊनच्या काळात विनाकारण घराबाहेर पडणारे, हॅल्मेटशिवाय प्रवास करणारे आणि लॉकडाऊनच्या नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलीस कारवाई करत आहेत. मात्र, लॉकडाऊनच्या काळात राजरोस सुरू असलेल्या मटका व्यवसायावर पोलीस कारवाई का करत नाही, असा सवाल विचारण्यात येत आहे. लॉकडाऊनच्या काळात अनेक कारवाया झाल्या. पण मटका व्यवसायावर कारवाई झालेली दिसत नाही. लॉकडाऊन जाहीर झाल्यानंतर मटका व्यवसाय काही महिने बंद होता. त्याकाळातही मटकावाल्यांकडून हफ्ते वसुली झाल्याची चर्चा आहे. लॉकडाऊनमध्ये सर्व व्यवहार ठप्प होते. मात्र, मे महिन्यापासूनच मटका व्यवसाय सुरू झाले आहेत. त्याठिकाणी सोशल डिस्टन्सिंग पाळण्यात येत नसल्याने कोरोनाचा फैलावाचा धोका व्यक्त करण्यात येत आहे.

आपली प्रतिक्रिया द्या