Ratnagiri News – खैराच्या लाकडांची अवैध वाहतूक पकडली; दोन वाहनांसह 11 लाख 72 हजाराचा मुद्देमाल जप्त

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

रत्नागिरीतील निवळी येथे खैराच्या लाकडांची अवैध वाहतूक करणाऱ्या दोन वाहनांना स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेने पकडल्या. गस्त घालत असताना निवळी-बावनदी दरम्यान हि कारवाई केरण्यात आली. दोन्ही वाहनांमध्ये एकूण 181 खैराची लाकडे सापडली आहेत. खैराची लाकडे आणि दोन वाहने असा मिळून 11 लाख 71 हजार 500 रूपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.

निवळी येथे बोलेरो पिकअप आणि टाटा योद्धा या दोन गाड्यांची पोलिसांनी पहाणी केली असता त्यामध्ये खैराची लाकडे सापडली. हि अवैध वाहतूक करणाऱ्या आरोपी अजित गंगाराम चव्हाण ,अरबाज हमीद सुर्वे आणि त्यांच्यासोबत असलेला अक्षय चव्हाण यांनी खैराच्या झांडांची चोरून तोड केली आणि त्या लाकडांची वाहतूक करत होते. या अवैध वाहतूकी विरोधात रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदवण्यात आला होता. हि कारवाई जिल्हा पोलीस अधीक्षक नितीन बगाटे आणि अपर पोलीस अधीक्षक बी.बी.महामुनी यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेचे निरीक्षक नितीन ढेरे, प्रशांत बोरकर,सुभाष भागणे,नितीन डोमणे, भैरवनाथ सवाईराम आणि अतुल कांबळे यांनी केली.