पाकिस्तानी फलंदाजाचे तरुणींसोबतचे अश्लील संभाषण जगजाहीर

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

सामना ऑनलाईन, लाहोर

जाड भिंगाचा चष्मा लावून फलंदाजी करणारा पाकिस्तानचा फलंदाज इमाम उल हक हा त्याच्या फलंदाजीपेक्षा हल्ली इतर धंद्यांमुळेच जास्त चर्चेत असतो. तो पुन्हा एकदा चर्चेत आलाय तो त्याच्या काही तरुणींसोबतच्या अश्लील संभाषणामुळे. त्याने केलेल्या व्हॉटसअप मेसेजचे स्क्रीनशॉट व्हायरल झाले आहेत. या मेसेजेसवरून तो यातील काही तरूणींना फसवत असल्याचा दाट संशय यायला लागला आहे. एका तरुणीला इमामने पाठवलेला  ‘मी तुझ्य़ाशी असलेले संबंध तोडतोय’ असा मेसेजही व्हायरल झाला आहे. या मेसेजमुळे इमामला क्रिकेट खेळण्यापेक्षा लफडी करण्यातच जास्त रस दिसतोय अशा शब्दात पाकिस्तान क्रिकेटप्रेमींनी त्यांचा संताप व्यक्त करायला सुरुवात केली आहे. या मेसेजच्या सत्यतेबाबत अजून कोणीही दुजोरा दिलेला नाहीये.

इमामचा संघात समावेश झाला तेव्हा त्याच्यावर पाकिस्तानच्या माजी क्रिकेटपटूंकडून कौतुकाचा वर्षाव करण्यात आला होता. त्याच्या खांद्यावर सलामीवीराची जबाबदारी सोपवण्यात आली. सुरुवातीला काही चांगल्या खेळी खेळल्यानंतर इमाम जो भरकटला तो आजतागायत भिरकटतोच आहे. नुकत्याच झालेल्या विश्वचषक स्पर्धेत इमामने अत्यंत सुमार कामगिरी केली होती. पाकिस्तानचा माजी वेगवान गोलंदाज शोएब अखतरने इमामला फलंदाजी करता येते का ? असा प्रश्न विचारत त्याची पिसं काढली होती.   इमाम उल हक हा पाकिस्तानचा माजी फलंदाज इंजमाम उल हकचा पुतण्या आहे.