
हवामान खात्याने (IMD) मंगळवारी (१९ ऑगस्ट २०२५) मुंबईत पावसाचा रेड रेड अलर्ट जारी केला आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महानगरपालिकाने (BMC) मुंबईतील सर्व शासकीय, खासगी, महानगरपालिका शाळा आणि महाविद्यालयांना उद्या सुट्टी जाहीर केली आहे. X वर एक पोस्ट करत बीएमसीने ही माहिती दिली आहे.
हवामान खात्याने दिलेल्या माहितीनुसार, उद्या संपूर्ण मुंबई महानगर क्षेत्रात जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. तसेच अतितीव्र पावसामुळे पाणी साचण्याची, वाहतूक कोंडीची आणि इतर आपत्तींची शक्यता आहे. गेल्या काही दिवसांपासून मुंबईवर पावसाचे सातत्याने सावट असून, आज देखील दुपारी १२ वाजेनंतर शाळा-महाविद्यालयांना सुट्टी जाहीर करण्यात आली होती. हवामान खात्याने पुढील काही दिवस पावसाचा जोर कायम राहण्याचा अंदाज वर्तवला आहे.
📢 मुंबईतील सर्व शाळा, महाविद्यालये यांना उद्या दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी सुटी !
🌧 भारतीय हवामान खात्याने उद्या मंगळवार, दिनांक १९ ऑगस्ट २०२५ रोजी मुंबई महानगरात (मुंबई शहर आणि उपनगरे) अतिमुसळधार पावसाचा इशारा (रेड अलर्ट) दिला आहे.
🏫 या पार्श्वभूमीवर, मुंबई महानगर…
— माझी Mumbai, आपली BMC (@mybmc) August 18, 2025