21 चे महत्त्व

बातमी शेअर करा :
सामना फॉलो करा

>> अक्षय महाराज भोसले

21 मोदक, 21 दुर्वा, 21 पत्री… काय आहे हे 21 चे महत्त्व….

देवा तूंचि गणेश । सकळार्थमतिप्रकाश ।
म्हणे निवृत्तिदास ।
अवधारिजो जी ।। श्रीज्ञानेश्वरी

सकलांचा बुध्दीदाता, सुखकर्ता, विघ्नहर्ता 14 विद्या व 64 कलांचे स्वामी अर्थात श्रीगणराया. ज्ञानाचा सागर असणारे संतश्रेष्ठ श्रीज्ञानेश्वरमहाराज ही आपल्या ग्रंथारंभी श्रीगणेशाना नमन करतात. गणेशोत्सव जवळ आला की आपली लगबग सुरु होते ती म्हणजे दुर्वा, मोदक आदी. अनेकदा आपणा सर्वांना प्रश्न पडतो की बाप्पांना 21च दुर्वा, 21च मोदक, 21च प्रदक्षिणा कशाकरता?

21 या अंकाचे एकूणच धार्मिक महत्त्व खूप आहे. पण त्यातही गणेशोत्सवात तर या अंकाला वेगळेच महत्त्व लाभले आहे. पहिलं सांगायचं म्हणजे चतुर्थीपासून दररोज ओळीने 21 दिवस शक्यतो ठराविक वेळी ठराविक गणेशमूर्तीचेच दर्शन घेतले जाते. त्यामुळे खूप पुण्य मिळते अशी भाविकांची श्रद्धा आहे. दुसरं म्हणजे श्रीगणेश मंदिराला 21 प्रदक्षिणा घातल्या जातात.

काही भाविक गणेश मंदिरावर 21 नारळांचे तोरण बांधतात. त्याचप्रमाणे काही भाविक 21 दूर्वांची माळ श्रीगणेशास 21 दिवस घालतात हे आपल्याला माहीत आहेच. पण काहीजण 21 दिवस गणेशास दूर्वा वाहिल्याशिवाय न जेवतही नाहीत. काही भाविक ओळीने 21 चतुर्थ्या उपवास करतात. श्रावण शुद्ध चतुर्थी ते श्रावण वद्य चतुर्थी गणपतीची 21 दिवस दररोज पूजा केली जाते. गणेशास 21 दूर्वा, 21 पत्री व 21 फुले, 21 प्रदक्षिणा, 21 अर्घ्य व 21 मोदकांचा नैवेद्य दाखवावा

तिळी चतुर्थी हे व्रत माघ शुद्ध चतुर्थीस केले जाते. गणेशपूजन करुन दिवसभर उपवास करुन रात्री सोडावा. पांढऱया तीळाच्या 21 लाडवाचा नैकेद्य श्रीगणेशास दाखकतात. अंगारकी चतुर्थीच्या एका दिकशी अथका इतर कोणतेही ओळीने 21 दिकस शमी अथका मंदार कृक्षाच्या मुळाशी बसून उपासना कराकी आणि शास्त्राsक्त पूजापूर्कक त्याची मुळी काढून त्यातून गणेशमूर्ती बनकून घ्याकी. नंतर त्याची 21 कर्षे सतत उपासना घडल्यास गणेश अकश्य प्रसन्न होतो.

अथर्कशीर्ष उपासनेत 21 अक्षता घ्याक्यात. एक-एक अक्षता अथर्कशीर्ष मंत्राने गणपतीकर काहून आकाहन कराके. नंतर ताम्हणात मूर्ती घेऊन 21 अथर्कशीर्ष मंत्रानी अभिषेक करावा. त्यानंतर आसनावर 21 दूर्वांकूर प्रत्येकी एक-एक अथर्वशीर्षाने मंत्रून आसन तयार करावे व त्यावर श्रीगणेशाची स्थापना करावी. पुन्हा 21 दूर्वांकूर अथर्वशीर्षाने मंत्रून गणेशावर वहावे. शेवटी 21 अक्षतांनी पहिल्याप्रमाणे अथर्वशीर्षाने मंत्रून गणपतीवर वहावे. हा विधी चतुर्थीला सुरू करुन 21 दिवस चालू ठेवावा. 22 व्या दिवसापासून रोज प्रत्येकी एका अथर्वशीर्षमंत्राने एक असे 21 वेळा रोज हवन करायचे. असे चतुर्थीपर्यंत करावे व चतुर्थीच्या दिवशी उपवास करुन रात्री सुवासिनी-ब्राह्मणांसह उपवास सोडावयाचा. या 30/31 दिवसांच्या काळात ‘ॐ गं गणपतये नम:’ या मंत्राचा फुरसतीचे वेळी जप चालू ठेवावा.

अशाच प्रकारची रचना मोदकांच्या बाबतीतही आहे. आपण 21पैकी एक मोदक श्रीगणेशांच्या पायापाशी ठेवतो. म्हणजे अद्वैताकार झालेली वृत्ती श्री मोरयांच्या चरणाशी ठेवणे व उर्वरित वीस मोदक आपण परत घेतो. श्रींच्या चरणी ठेवताना तो नैवद्य होतो व परत घेतो तेव्हा तो प्रसाद असतो. आता श्रींच्या कृपेने जीवनातील या सर्व गोष्टी प्रसादरूपाने स्वीकारणे याला मोदक असे म्हणतात. म्हणून तो मोदक आहे. मोद म्हणजे आनंद व क म्हणजे करणारा. जीवनातील प्रत्येक गोष्टीला श्रींचा प्रसाद म्हणून स्वीकारले तर जीवनात आनंदच असतो. त्या आनंदासाठी श्रींना प्रार्थना म्हणूनच 21 दुर्वा, 21 मोदक.

21 पत्री
हराळी, माका, तुळस, साखरवेल, मरवा, आघाडा, धोत्रा, जाई, मधुमालती, केवडा, डोरले, रुई, बेल, बोर, कण्हेर, डाळींब, पिंपळ, हादगा, शमी, अर्जुन सादडा, देवदार

श्रींना दुर्वा वाहताना 21 नावे
गणाधिशाय नमः, उमापुत्राय नमः, अभयप्रदाय नमः, एकंदताय नमः, ईभवत्राय नमः, मूषकवाहनाय नमः, विनायकाय नमः, ईष्टपुत्राय नमः, सर्वसिद्धीप्रदाताय नमः, लंबोधराय नमः, अधनाशाय नमः, विघ्नविध्वंसकर्ते नमः, विश्ववंद्याय नमः, अमरेश्वराय नमः, गजवत्राय नमः, नागयज्ञोपवितये नमः, भालचंद्राय नमः, परशुधारणे नमः, विघ्नाधिशाय नमः, सर्वविद्याप्रदायकाय नमः, गं गणपतये नमः

21 गणेश क्षेत्र
मोरेश्वर, रांजणगाव , थेऊर, काश्यप्राशय, जलेशपूर, लेण्याद्री (पुणे), प्रयाग , काशी (उत्तर प्रदेश), कलंभ (यवतमाळ), अदोष (नागपूर), पाली (पल्लीपूर), परिनेर, गंगामसले (मनमाड), राक्षसभुवन, नामगाव, राजूर (जालना), सिद्धटेक (दौंड), विजयपूर (चेन्नई), वेरूळ (संभाजीनगर), पद्मालय (पाचोरा), कुंभकोनम (दक्षिण हिंदुस्थान).

21 फुले
जास्वंद, जाई, मधुमालती, सोनचाफा, तांबडे कमळ, केवडा, बकुळ, उंडी ( उंडल), पोफळ, नागचाफा, मोगरा, धोत्रा, कण्हेर, नांदूरकी, कावळा, शेवंती, आंब्याचा मोहोर, प्राजक्त, गोकर्ण